जुन्नरः राज्य मतदार दिनानिमित्त आवटे विद्यालयाच्या वतीने प्रभात फेरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

जुन्नर (पुणे): राज्य मतदार दिनानिमित्त येथील अण्णासाहेब आवटे विद्यालयाच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीचा समारोप जुन्नर तहसील कार्यालयात जुन्नरचे तहसीलदार किरणकुमार काकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तहसीलदार किरणकुमार काकडे यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत, नागरिकांनी मतदानाचा मूलभूत हक्क बजावण्यासाठी विद्यार्थ्यांनी काढलेली प्रबोधनात्मक प्रभात फेरीचा उपक्रम कौतुकास्पद असून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन काकडे यांनी केले.

सकाळी 11 वाजता विद्यालयाचे मुख्याध्यापक के एस ढोमसे, पर्यवेक्षक रोहिदास भागवत, प्रगतशील व्यापारी अशोक बोकरिया यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी मार्गावर नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रबोधनपर घोषणा दिल्या. राज्य मतदार दिना निमित्ताने विद्यालयाच्या वतीने मतदार दिवसाचे संदेश देणारी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे नियोजन कलाशिक्षक संजय वाडकर यांनी केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:ञ
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​
Web Title: pune news annasaheb aawte vidyalay junnar