एज्यु कॉर्नर : इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचे दूध

K. S. Azad
K. S. Azadesakal

लेखक : के. एस. आझाद

इंग्रजी शिक्षणाकडे सर्वांचाच सध्या कल दिसून येतो. प्रत्येक पालकाला असेच वाटते, की आपल्या मुलाने अथवा मुलीने इंग्रजी शाळेत शिक्षण घेऊन आपले करिअर घडवावे. यासाठी इंग्रजी लिहिता बोलता व वाचता आले पाहिजे.

कारण सर्वच अभ्यासक्रम इंग्रजीतून असणार आहे. इंग्रजी ही आता सर्वत्र आवश्यक भाषा बनली आहे. बऱ्याचदा असे होते, की मुले इंग्रजीमध्ये शिक्षण घेत आहेत, पण पालकांना इंग्रजीचे ज्ञान कमी असते.

बहुतांश पालकांना कामचलाऊ इंग्रजी देखील बोलता येत नाही. त्यामुळे घरातील वातावरणात इंग्रजी भाषा अथवा शब्दांचा जर कमी वापर असेल तर विद्यार्थ्यांना इंग्रजीचे आकलन करताना किंवा ती समजून घेताना अडचणी निर्माण होतात.

त्यामुळे पालकांनी देखील आपली दैनंदिन कामे सांभाळून इंग्रजी भाषा अवगत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचाही इंग्रजी भाषा शिकण्याचा व अवगत करण्याचा प्रवास सोपा होईल. (Saptarang latest marathi articles by KS Azad on Education corner nashik news)

K. S. Azad
संवाद आणि विश्वास लोकशाहीचा गाभा

भाषा कोणीही शिकू शकत नाही. मग ती इंग्रजी असो अथवा अगदी मराठी. एका उदाहरणातून आपल्याला हे लगेच पटेल. हे उदाहरण आपल्या सर्वांच्या माहितीतील आहे. हा प्रकार जवळपास प्रत्येक घरात घडलेला आहे. घरात जी भाषा वापरली जाते, तीच भाषा मुले बोलायला शिकतात.

त्या भाषेचे निरीक्षण करून, घरातील मंडळींच्या देहबोली, उच्चारावरून लहान मुले बोलू लागतात. नियमितपणे त्यांच्या कानावर जे शब्द पडतात, ती भाषा समजून न शिकता सुद्धा ते बोलू लागतात. याचं मुख्य कारण म्हणजे घरात बोलताना वापरली जाणारी भाषा.

घरातील सर्व सदस्य जी भाषा बोलतात, ती मातृभाषा असते. ती शिकण्यासाठी फारसे कष्ट पडत नाहीत. अतिशय सहजपणे घरातील वातावरणात ऐकून मातृभाषा अवगत होते. ही गोष्ट इंग्रजीलाही लागू आहे.

जोपर्यंत किमान इंग्रजीचे वातावरण घरात तयार होत नाही, तोवर इंग्रजीची सवय लागणार नाही. तुमच्या अवतीभवती नियमितपणे इंग्रजी बोलणारे वातावरण जर असेल तर निश्चितपणे इंग्रजी लवकर बोलणे शक्य होईल, असे माझे ठाम मत आहे.

इंग्रजी वाचता बऱ्याच जणांना येते, पण समजून सांगता येत नाही. यास मुख्य कारण म्हणजे शब्दांची कमतरता. याला व्होकॅबलरी म्हणतात.आपल्याकडे शब्दसाठा किती आहेत, त्यावर इंग्रजी बोलणे, समजणे व लिहिणे अवलंबून आहे.

लहानपणी कुठल्याही व्याकरणाचा अभ्यास नसताना सुद्धा आपण मराठी अतिशय सहजपणे बोलू शकत होतो, मग इंग्रजीच्या व्याकरणाची गरज बोलताना का भासते? खूप खोलवर व्याकरण माहित नसले तरी थोडेफार ज्ञान असणे संयुक्तिक ठरते.

K. S. Azad
मातीच्या चुली

मात्र शब्दसाठा हा तुमच्याकडे असायलाच हवा. आपल्याजवळ मर्यादित शब्द असतील, तर सफाईदारपणे इंग्रजी बोलता अशक्य होते. तसेच वाचताना आणि काही गोष्टी समजून घ्यायलाही तणाव निर्माण होतो. शिवाय खूप ऊर्जा इंग्रजी समजून घेण्यात खर्च होते.

अलीकडच्या काळात असाही एक ग्रह निर्माण केला गेला आहे, की इंग्रजी न बोलता येणे म्हणजे कमीपणाचे आहे. मात्र हा ग्रह देखील चुकीचा आहे. पण सध्याच्या तंत्रज्ञानाच्या व डिजिटलायझेशनच्या युगात इंग्रजी भाषा अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी आहे.

कारण ही जगाची भाषा आहे. म्हणूनच इंग्रजीला वाघिणीने दूध संबोधले गेले आहे. त्यामुळे ती सर्वांना सफाईदारपणे आली म्हणजे जागतिक स्तरावरील आणि आपल्याकडेही कॉर्पोरेट्समधील वावर सहज होऊ शकतो. यासाठी अगोदर पालकांनीही इंग्रजी शिकण्याचे प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. 

सध्याच्या मॉडर्न कल्चरमध्ये प्रत्येक पालकाची इच्छा असते, की माझ्या मुलाने-मुलीने माझ्या इतर सहकारी नातलगांच्या मुलांप्रमाणे फाडफाड इंग्रजी बोलावे.आपल्या पाल्याचे इंग्रजी देखील पक्के असावे. पण बरीच मुले शाळेत असल्यावर शिक्षकांसमोर थोडफार इंग्रजी बोलतात.

पण शाळेतून घरी आल्यावर पुन्हा मराठीत बोलायला लागतात, हे बहुदा सर्वच पालकांचे म्हणणे असते. आपले पाल्य जर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहे, तर त्याने घरात देखील इंग्रजीत बोलायला हवे.

सध्याच्या जगात, इंग्रजी ही विविध गटातील संवाद साधण्याची प्रमुख भाषा झाली आहे. या जगात प्रभावीपणे काम करण्यासाठी स्पोकन इंग्लिश हे एक अत्यावश्यक कौशल्य झाले आहे. बऱ्याचशा भारतीय शाळांमध्ये शालेय इंग्रजीचे शिक्षण हे केवळ परीक्षा पास करण्यापुरतेच मर्यादीत केले जाते.

या परीक्षांमध्ये सुद्धा फक्त इंग्रजीचे वाचन, लिखाण व व्याकरण यावरच लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला स्पोकन इंग्लिशचे किती ज्ञान आहे, हे नीट तपासले जात नाही. बऱ्याच भारतीय विद्यार्थ्यांमध्ये स्पोकन इंग्लिशचे कौशल्य विकसित न होण्याचे हेच प्रमुख कारण आहे. पालक, विद्यार्थी व शिक्षक यांनी स्पोकन इंग्लिशसाठी एकत्रित प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. 

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

K. S. Azad
मनसंवेदन

चांगले इंग्रजी बोलण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ‘बोलणे'. सतत बोलणे. बरेचसे भारतीय पालक अस्खलित इंग्रजी बोलू शकत नसल्याने ते त्यांच्या मुलांचा इंग्रजी बोलण्याचा सराव घेऊ शकत नाहीत, ही सर्वांत मोठी समस्या आहे.

त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगणे खूप महत्वाचे आहे की जेवढे शक्य असेल, तेवढे शाळेतच त्यांच्या मुलांनी इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न सुरु ठेवावा. शाळेमध्ये विद्यार्थी आपल्याच वयोगटातील मुलांबरोबर असल्याने ते एकमेकांशी न घाबरता इंग्रजीत संवाद साधू शकतात.

चांगल्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये एकमेकांना त्यांच्या चुका अगदी सहज हसत-खेळत सांगू शकतात, त्या चुका सुधारण्याची संधीही त्यांना तिथे मिळते. पालकांनी मुलांना इंग्रजी बोलणारे ग्रुप तयार करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे.

कोणतीही भाषा व्यवस्थित बोलायची असेल, त्या भाषेमध्ये स्वतःला व्यक्त करायचे असेल तर तुम्हाला त्या भाषेमधील शब्द व्यवस्थित माहित असायला हवेत. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी इंटरनेटवर बरेच फ्री सोर्स तुम्हाला सापडतील.

गुगलवर 'हाऊ टू इम्प्रूव   व्हॅक्युबलॅरी' असे टाईप करा. तुम्हाला बरेच उपयुक्त स्रोत मिळतील. बऱ्याच संसाधनांची माहिती असण्यापेक्षा एखाद्या संसाधनाचा तुम्ही कशाप्रकारे वापर करता हे जास्त महत्वाचे आहे. एका वेळी खूप साऱ्या वेबसाईटचा वापर करू नका. त्यातील काही निवडक अशा वेबसाइटवरून अभ्यास करा.

शब्दसंग्रह वाढवण्यासाठीचा एक सोपा उपाय म्हणजे फ्लॅशकार्ड बनवणे. उदाहरणार्थ तुमच्या मुलाचे ३ महिन्यांत १०० नवीन शब्द शिकण्याचे ध्येय असेल, तर मुलांना चार्ट पेपर व स्केचपेनचा उपयोग करून प्रत्येक शब्दासाठी एक फ्लॅशकार्ड बनवायला सांगा.

प्रत्येक फ्लॅशकार्डच्या एका बाजूला एक नवीन शब्द लिहा व दुसऱ्या बाजूला त्याचा अर्थ लिहा. मुलांना दररोज कमीत कमी ५ फ्लॅशकार्ड पुढे मागे बघायला सांगा, हे करायला जास्तीत जास्त १०-१५ मिनिटे लागतील. परंतु ही पद्धत नियतमीतपणे अवलंबली तर मुलांचा शब्दसंग्रह नक्कीच वाढेल.

स्पोकन इंग्लिशमध्ये प्राविण्य मिळवायचे असेल तर शुद्ध उच्चारण अनिवार्य आहे. याचा अर्थ असाही नाही, की तुमच्या पाल्याने ब्रिटिश अथवा अमेरिकी लकबीत बोलले पाहिजे. परंतु शब्दांचे अचूक उच्चारण करणे, अत्यंत महत्वाचे आहे.

लहान मुलांना भाषा शिकणे फारसे अवघड नसते. त्यांना केवळ नियमित अभ्यास व सकारात्मक वातावरणाची गरज असते. मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी तुम्ही जी कोणती पद्धत अवलंबाल, त्यात काही मजेशीर घटक समाविष्ट करायला विसरू नका.अशा पद्धतीने पालक व पाल्य यांची काही काळातच स्पोकन इंग्लिशमध्ये नक्की प्रगती करेल.

(लेखक हे क्लिफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

K. S. Azad
अचूक निदानाचे गणित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com