Dhule District Collector : माहिती देणाऱ्यास मिळणार लाखाचे बक्षीस! : जिल्हाधिकारी गोयल

dhule district collector abhinav goyal
dhule district collector abhinav goyalesakal

Dhule District Collector : गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान तंत्र कायद्यांतर्गत बेकादेशीरपणे गर्भपात व गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन करणारे सोनोग्राफी केंद्र अथवा व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले. (District Collector Abhinav Goyal appealed to provide information about individuals or center doing abortion and gender diagnosis dhule news)

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन चित्तम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, मनपाचे ‍जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. आर. शेख, पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीचे ॲड. चंद्रकांत येशीराव, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री शहा, जिल्हा विधी समुपदेशक समितीच्या ॲड. मीरा माळी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्ह्यात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ कार्यक्रमांतर्गत मुलींवर जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावे. मुलींचा जन्मदर कमी असलेल्या तालुक्यातील गावानिहाय यादी तयार करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

dhule district collector abhinav goyal
Dhule ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषदेत आजपासून साडेतीनशेवर पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

कन्यारत्नाचे आगमन झाल्यास त्या गावात एक वृक्ष लावावा. सर्व यंत्रणांनी समन्वयातून कामकाज करावे. सर्व तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षक तसेच मनपा कार्यक्षेत्रातील झोनल अधिकाऱ्यांनी संशयित सोनोग्राफी व एमटीपी केंद्राची नियमित तपासणी करावी.

संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक

जिल्ह्यात अवैधरीत्या गर्भलिंग निदान व गर्भपात करणाऱ्या, ते करून घेणाऱ्या व्यक्तींची माहिती द्यावी, अशी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून त्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. त्यासाठी १८००-२३३-४४७५ या हेल्पलाइन क्रमांकावर तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिका वैद्यकीय अधिकारी किंवा तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षकांकडे, तसेच www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.

dhule district collector abhinav goyal
Dhule News : क्रांतिदिनी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार; स्वातंत्र्यसैनिकांची नावे शिलालेखावर कोरली जाणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com