जळगावः गिरडला विद्यार्थ्यांनी बनविल्या दोनशे गणेशमूर्ती

रमेश धनगर
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

जवाहर हायस्कूलचा उपक्रम; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन

गिरड (ता. भडगाव, जळगाव): येथील जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घरगुती गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी सुमारे दोनशे गणेशमूर्तींची स्वनिर्मिती केली. या गणपतींच्या मूर्तींचे प्रदर्शन नुकतेच शाळेत भरविण्यात आले होते. यानिमित्ताने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.

जवाहर हायस्कूलचा उपक्रम; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन

गिरड (ता. भडगाव, जळगाव): येथील जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घरगुती गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी सुमारे दोनशे गणेशमूर्तींची स्वनिर्मिती केली. या गणपतींच्या मूर्तींचे प्रदर्शन नुकतेच शाळेत भरविण्यात आले होते. यानिमित्ताने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील, सदस्य भास्कर पाटील, माजी प्राचार्य पी. सी. धनगर, रामकृष्ण सिंहले यांच्यासह पालकांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले श्रीगणेश पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पाचवी ते बारावीच्या कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या मूर्ती तयार केल्या आहेत.
विद्यार्थ्यांना कला शिक्षिका एस. व्ही. पाटील, अजित मनोरे, विजया पाटील व जयश्री पाटील यांनी कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण दिले होते. या उपक्रमामुळे पालकांना हजारो रुपयांची बचत करता आली असून, जल व ध्वनीप्रदूषणासारख्या गोष्टी देखील टाळता येतील असे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना सांगितले.

यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ या कार्यानुभवाच्या उपक्रमांतर्गत राखी बनवण्याचा उपक्रमही अरुण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला होता. गणेश मूर्ती निर्मितीच्या स्पर्धेत केदार चौधरी, जान्हवी पाटील व प्रियंका पाटील यांनी बक्षीस पटकावले. या उपक्रमासाठी प्राचार्य एस. एस. पाटील, उपमुख्याध्यापक अरुण बागूल, पर्यवेक्षक ए. बी. बोरसे व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
'प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार, जीवनाचा अविभाज्य घटक- सर्वोच्च न्यायालय
मोहर्रम असल्याने दुर्गा विसर्जनास परवानगी नाही: ममता बॅनर्जी
गौराईचं कौतुकच न्यारं... गौरी गणपतीच्या गाण्यांचा खजिना
ज्येष्ठांच्या पुढाकाराने सरला शिवारातला दुष्काळ
परभणी: कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याची अात्महत्या
सर केले तीन गड
तांदूळ, तीळ, मोहरीवर लिहिले सात ग्रंथ
कऱ्हाड: अठरा नख्यांचे कासव आढळले मृत अवस्थेत
बीड: चोरट्यांनी फोडली पोलिस ठाण्याजवळील सहा दुकाने
आजही 'ती' पुन्हा बिघडली; मेढा आगाराचा भोंगळ कारभार
प्लांट टिशू कल्चर लॅब’ सुरू होण्यापूर्वीच रद्द
ग्रामपंचायत करणार रस्त्यावर फलक लावून दारू विक्री
गवताचा बाप्पा आशीर्वादासाठी सज्ज! 

Web Title: jalgaon news girad student make ganpati idol