महापालिकेतर्फे जळगाव शहरात अतिक्रमणाची कारवाई
जळगाव : जळगाव शहरात आज (मंगळवार) महापालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. यात सकाळी नऊपासूनच कारवाईला पोलिस बंदोबस्तात सुरुवात झाली. कारवाईत मोठ्या प्रमाणात लोटगाड्या टपऱया निष्कासित करण्यात आल्या.
महापालिकेतर्फे जळगाव शहरात अतिक्रमण निर्मूलन करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. सकाळी ९ वाजता साने गुरुजी चौकापासून करावाईला प्रभारी अपर आयुक्त राजेश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईला सुरुवात झाली. बळीराम पेठ येथील धरणगाव गल्लीत भाजी विक्रेते व मनपाचे अतिक्रमण विभागातील पथकातील कर्मचाऱ्यांची किरकोळ वाद झाले. तसेच कारवाईत जप्त केलेले लोड गाड्या, टपऱया व पेट्या या जेसीबीद्वारे तोडण्यात आल्या. त्यानंतर शहरातील सर्व नो हॉकर्स झोनमधील मधील अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी शहर पोलिस शहर व शनिपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता.
ई सकाळवरील इतर ताज्या बातम्या :
- व्यासंगातून घडलेली बहुविध पिकांची शेती
- आशावर्कर व गटकर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
- रायगड जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया संपन्न
- मृत्युमुखी पडलेल्या वायरमनच्या पत्नीला नोकरीस घ्या
- 'गोकुळ माळी खून प्रकरणाची सीआयडी चौकशी करा'
- चार महिन्यांपूर्वी गिळलेले नाणे काढले पोटातून
- बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई कधी होणार?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.