नाशिक जिल्ह्यात बिबट्यामुळे घबराट; हल्ल्यात बकरी ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

नाशिक जिलह्यातील दिंडोरी तालुक्‍यातील वणी गावाच्या जवळ असलेल्या एकलहरे येथील परिसरात गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांना बिबटा आढळून येत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

वणी (नाशिक) : नाशिक जिलह्यातील दिंडोरी तालुक्‍यातील वणी गावाच्या जवळ असलेल्या एकलहरे येथील परिसरात गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांना बिबटा आढळून येत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास एका बिबट्याने मळ्यातील गोठ्यात बांधलेल्या एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना समोर आली आहे.

एकलहरे परीसरात महिनाभरापासून शेतकऱ्यांना वेगवेगळया ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असून याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे कळविले आहे. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अशोक नामदेव पवार यांच्या मळ्यातील गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला चढविला. यावेळी शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात येताच अशोक पवार व घरातील लोकांनी आरडाओरड केली असता, बिबट्या पळून गेला. दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी जागीच ठार झाली. याबाबत वनविभागास घटनेची माहिती दिली असून आज (बुधवार) दुपारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची भेट देऊन पंचनामा केला आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण असून पावसानंतर शेतीची कामे सर्वत्र सुरु असल्याने वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी शिवसेनेच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा संगिता राऊत, सामाजिक कार्यकर्ते वामन राऊत, अशोक पवार यांनी केली आहे.
ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः
जिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार​
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
योगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी
कर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा
धोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड
रुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​
‘योगा’त रमले आयटीयन्स​
संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी
हीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी?​
#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद

Web Title: nashik news maharashtra news leopard attack vani news