जनतेच्या परिक्षेत भाजप 'ढ' ठरली: संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उभी आहे, याची मुख्यमंत्र्यांना अडचण होतेय का? शेतकऱ्यांचे प्रश्न एकतर तुम्ही सोडवा, अथवा आम्हाला तरी सोडवू द्या. जनतेच्या परिक्षेत तुम्ही ढ ठरला आहात.

नाशिक - शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उभी आहे, याची मुख्यमंत्र्यांना अडचण होतेय का? शेतकऱ्यांचे प्रश्न एकतर तुम्ही सोडवा, अथवा आम्हाला तरी सोडवू द्या. जनतेच्या परिक्षेत तुम्ही ढ ठरला आहात, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या संपावरून भाजपला लगाविला.

शिवसेना नेते संजय राऊत नाशिकमध्ये असून, शेतकरी प्रश्नावर ते उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शेतकऱ्यांनी कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.

संजय राऊत म्हणाले -

 • शिवसेनेने शेतकरी प्रश्नावर पहिल्यांदा आवाज उठवला.
 • शिवसेना संपर्क अभियानाची सुरूवात करत आहे.
 • गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना भेटणार.
 • भविष्यातल्या मोठ्या उलथापालथीची सुरूवात झाली आहे.
 • ज्यादिवशी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरतील तेव्हा भाजपच्या मंत्र्यांना बाहेर पडणे अवघड होईल.
 • मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्ती द्यायला हवी.
 • विरोधात असताना मुख्यमंत्री कर्जमाफीबाबत बोलत होते, मग आता त्यांना काय झाले
 • गरजू शेतकरी कोण हे ठरवणारे मुख्यमंत्री कोण?
 • शेतकरी प्रश्नावर सुरू झालेला गोंधळ मिटवण्यासाठी शिवसेना संपर्क यात्रा सुरू करणार
 • केवळ शिवसेना पदाधिकारी म्हणून मिरवण्यात काही अर्थ नाही.
 • शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरा.
 • मित्र पक्षाबरोबरच आपली लढाई आहे.
 • शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याविरोधात लढा उभारायचा आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
नवी मुंबईत रिक्षा चालकांकडून बस चालक व वाहकाला मारहाण
शिवराजसिंह चौहानांचे उपोषण सुरु; शेतकऱ्यांशी चर्चेस तयार
धुळे: पावसामुळे तामसवाडीजवळ रस्ता गेला वाहून
पुणे: मोदी फेस्टच्या कार्यक्रमाला खासदार, आमदारांची दांडी
लष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार
महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा
धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
 

Web Title: Nashik News Shiv Sena leader Sanjay Raut criticize BJP