Nashik Leopard News : पाथर्डी गावात बिबट्या पिंजऱ्यात बंद

A leopard imprisoned in a cage kept in Navale farm here.
A leopard imprisoned in a cage kept in Navale farm here.esakal

Nashik News : पाथर्डी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या गुरुवारी (ता.२३) सकाळी वनविभागाने परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बंद झाला. बिबट्या पिंजऱ्यात बंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

विशेष म्हणजे एक वर्षांपूर्वी नवले मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात, सकाळी एक दोन वर्षाचा बिबट्या पिंजऱ्यात बंद झाला होता. (Leopard caged in Pathardi village nashik news)

त्याच घटनेचा अगदी बिबट्या बघणाऱ्यांसह आज घटनाक्रम योगायोगाने घडून आल्याने 'बिबट्या २' अशी फिल्मी चर्चा परिसरात सुरू होती. पाथर्डी भागातील नवले मळा परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर असल्याची माहिती भाऊसाहेब नवले यांनी दिली.

अनेकांना बिबट्याने दर्शन देखील दिले होते. त्यामुळे वन विभागाकडे याप्रकरणी तक्रार केल्यानंतर १४ नोव्हेंबरला वनविभागाने पिंजरा लावला होता. परंतु आठवडा उलटून देखील हा बिबट्या पिंजऱ्यात बंद झाला नव्हता.

गुरुवारी (ता.२३) सकाळी साडेसहा वाजता नेहमीप्रमाणे धीरज नवले आणि गणेश नवले पाण्याचा पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती भाऊसाहेब नवले, पोपट नवले, दशरथ नवले आदींनी दिले.

A leopard imprisoned in a cage kept in Navale farm here.
Nashik News: महाआवास अभियान विशेष राज्य पुरस्कारात नाशिक जिल्ह्याची बाजी!

त्यांनी बिबट्या पिंजऱ्यात बंद झाल्याचे वनविभागाला कळविले. यानंतर वनपाल अनिल अहिरराव आणि वनरक्षक विजय पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी पोचत बिबट्यास गंगापूर रोपवाटिकेमध्ये स्थलांतरित केले.

दरम्यान आज मिळून आलेला बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय सुमारे सात वर्षे असल्याचे अहिरराव यांनी सांगितले. त्याला जुने ट्रॅकर देखील बसवलेले नाही. त्यामुळे नवा पाहुणा असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या अनेक दिवसांची दहशत असलेला बिबट्या आज पिंजऱ्यात अडकल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

पांडवलेणी भागात अजून एक बिबट्या असल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. त्यामुळे सर्वांनी विशेषतः अंधार पडल्यानंतर काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक शेतकऱ्यांनी केले वन विभागतर्फे करण्यात आले.

A leopard imprisoned in a cage kept in Navale farm here.
Nashik News: पटपडताळणीत 26 हजार विद्यार्थी गैरहजर; आदिवासी विभागाकडून पडताळणी अहवाल सादर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com