बुलडाणा: 'ग्रीन डे'निमित्त चिखलीत तीन शाळांत वृक्षारोपण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

पर्यावरण रक्षणासाठी सरकारने हाती घेतलेल्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे "सकाळ माध्यम समूहाने' सहभाग नोंदविला. आज (5 जुलै) "ग्रीन डे'च्या निमित्ताने "सकाळ'ने अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला.

चिखली (जि. बुलडाणा) - पर्यावरण रक्षणासाठी सरकारने हाती घेतलेल्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे "सकाळ माध्यम समूहाने' सहभाग नोंदविला. आज (5 जुलै) "ग्रीन डे'च्या निमित्ताने "सकाळ'ने अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला.

मानवी जीवनासाठी अनिवार्य असलेल्या प्राणवायूची गरज भागविणाऱ्या आणि मानवी जीवनांवर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या वृक्षांची संख्या दिवसेंदिवस अमर्यादित वृक्षतोडीमुळे कमी होत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनानेसुद्धा यंदाच्या वर्षी चार कोटी वृक्षांच्या रोपणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. "सकाळ माध्यम समूहा'ने या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवित आज विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याच उपक्रमातंर्गत चिखली शहरातील राधाबाई खेडेकर शिक्षण प्रबोधिनी, श्री.शिवाजी विद्यालय आणि श्री. शिवाजी विज्ञान कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची शपथ देत लावलेल्या वृक्षांची काळजी घेण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांची समिती गठीत करण्यात आली.

शहरातील राधाबाई खेडेकर शिक्षण प्रबोधिनी, श्री.शिवाजी विद्यालय आणि श्री.शिवाजी विज्ञान कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये बुधवारी (ता.5) सकाळ माध्यमसमुहाच्या पुढाकाराने आयोजित ग्रीन डे निमीत्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, माजी प्राचार्य गुलाबराव खेडेकर, नगर पालिका सदस्य पंडीतराव देशमुख, नगर पालिकेचे गटनेता डॉ.राजू गवई, जनशक्ति संघटनेचे कार्याध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक, अनिल चौहाण, राधाबाई खेडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब ठाकरे, श्री.शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एस.बारोटे, श्री.शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.बी.भुसारी, प्रा.श्री.गारोळे, प्रा.डॉ.जे.जे.जाधव, प्रा.श्री.पेन्शनवार, प्रा.श्री.पडवाल, प्रा.श्री.बोबडे, प्रा.श्री. चिंचोले, प्रा.श्री.कोकोडे, प्रा.गवई, प्रा.डॉ.वनिता पोच्छी, प्रा. श्रीमती काटोले, सुनिल बिडवे, जीवन शेटे, निलेश खेडेकर, विनायक देशमुख, नितीन देशमुख, सौ.सारीका देशमुख, सौ.प्रतिभा पाटील, निलेश खेडेकर, रविंद्र साळवे, श्री.खंडागळे, श्री.शिंदे, श्री.गायकवाड, मोहन गायकवाड, श्री.वानखेडे यांच्यासह शिक्षक, शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि हजारो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांना वृक्षलागवड आणि संवर्धनाची शपथ देण्यात आली.

■ ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​
Web Title: buldhana news marathi news tree plantation

फोटो गॅलरी