संसदेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत खासदार विनोद खन्ना आणि पल्लवी रेड्डी यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 17 जुलैपासून सुरवात होत असून, हे अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक 17 जुलै रोजीच होणार आहे. त्यादिवशीच पावसाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे. संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी रात्री ही बैठक झाली. एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पावसाळी अधिवेशनाबाबत बैठक झाली.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत खासदार विनोद खन्ना आणि पल्लवी रेड्डी यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
पैशांवरून आईशी भांडण; दहावीतील मुलाची आत्महत्या
जयपूर पोलिसांच्या पोस्टर्समुळे बुमराहची नाराजी​
चीनमध्ये "माळीण'सदृश शोकांतिका; 100 मृत्युमुखी
काश्‍मीर:मशिदीबाहेर पोलिस अधिकाऱ्यास ठेचून मारले​
एकत्र आले ठाकरे, फडणवीस, गडकरी आणि नारायण राणे
"सुपर' श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत !
भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटींग​
‘सकाळ’सारखी रचनात्मक, सकारात्मक पावले गरजेची - कारमॉन​
#स्पर्धापरीक्षा - जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा​
वादग्रस्त कामांवरून महाजन, सवरांमध्ये जुंपली​