कुत्र्याचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

संजय मालवणकर
रविवार, 23 जुलै 2017

बिबट्याने कुत्र्याची पाठ धरली होती. त्या झटापटीत अखेर कुत्रा जवळच्या खोल विहिरीत पडला.

वेंगुर्ले : दाभोली नागडेवाडी येथे आज (रविवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कुत्र्याचा पाठलाग करत आलेला बिबट्या आणि कुत्रा दोन्ही 20 फुट खोल पाणी असलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी मृत बिबट्याला व कुत्र्याला बाहेर काढले. 

दाभोली नागडेवाडी येथील दादा पेडणेकर यांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा कुत्रा जोरजोरात भुंकत असल्याचे ऐकू आले. ते बाहेर आले त्यावेळी बिबट्याने त्यांच्या कुत्र्याची पाठ धरली होती. त्या झटापटीत अखेर कुत्रा जवळच्या खोल विहिरीत पडला. त्यापाठोपाठ बिबट्याही विहिरीत पडला. पेडणेकर यांनी या घटनेची कल्पना पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर यांना दिली. त्यांनी तातडीने वनविभागाला कळवले. 

सकाळी आठ वाजता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत 20 फुट खोल पाणी असल्याने त्यात पडलेला बिबट्या आणि कुत्रा हे विहिरीच्या तळाशी गेले होते. अखेर येथील ग्रामस्थ प्रसाद हळदणकर, प्रवीण बांदवलकर, प्रफुल्ल बांदवलकर व विठ्ठल गोवेकर हे त्या खोल विहिरीत उतरले. त्यांनी विहिरीच्या तळाला मृत अवस्थेत असलेल्या वाघाला ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढले. मृत वाघाचा पंचनामा करून वन विभागाने तो आपल्या ताब्यात घेतला. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या : 
जोगेश्वरीत बेकरीची चिमणी कोसळल्याने तिघांचा मृत्यू, 2 जखमी
संगमनेर: २५० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त; वाळू तस्करांमध्ये खळबळ 
अयोध्येत राममंदिर कायदेशीर मार्गानेच: अमित शहा
खासगी, सरकारी जमिनीवर वनाच्छादन वाढविणार
शिवाजीराव पाटील यांचे निधन
शेतकऱ्यांना खरिपासाठी तातडीने मदतीचे वाटप
थेट चर्चेद्वारा तणाव कमी करा; भारत आणि चीनला पेंटॅगॉनचा सल्ला
काँग्रेस एकत्र आल्या, तर मोदी लाट रोखणे शक्‍य - पृथ्वीराज चव्हाण
...तर शाहबाज घेणार शरीफ यांची जागा
अमेरिकेच्या हल्ल्यात 16 पोलिस कर्मचारी ठार
सद्यःस्थितीमुळे 'पाक'ला मदत नाकारली: जीम मॅटीस