अंगणवाडी सेविका या ताई नसून आई आहेतः पंकजा मुंडे

दिनेश मराठे
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबईः अंगणवाडी सेविका या ताई नसून आई आहेत. तुम्ही आपल्या मुलांना वेळेवर खाऊ न देता अंगणवाडीतील मुलांना सांभाळता त्यांना जीव लावता. त्यामुळे तुमच्या  वेतन वाढ आणि अन्य मागण्या मान्य करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन, असे आश्वासन महिला व  बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी अगंणवाडी सेविकांना दिले.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांनी महाराष्ट्र सरकारला 2 लाख कर्मचाऱ्यांच्या 11 सप्टेंबर 2017 पासून होणाऱ्या बेमुदत संपाची जाहिर नोटीस देण्यासाठी मुंबई आझाद मैदान येथे बैठा मोर्चा काढला. त्या प्रसंगी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी प्रत्यक्ष भेट देत त्यांच्या मागणी संदर्भात माहिती घेतली.

छोटेखानी कार्यक्रमात बोलताना मुंडे म्हणाल्या, 'अंगणवाडी सेविका या ताई नसून आई आहेत. तुम्ही आपल्या मुलांना वेळेवर खाऊ न देता अंगणवाडीतील मुलांना सांभाळता त्यांना जीव लावता. त्यामुळे तुमच्या वेतन वाढ आणि अन्य मागण्या मान्य करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आठ दिवसांत चर्चा करुन आपल्या मागण्या मान्य करुन तुम्हाला रिटर्न गिफ्ट देईन. मी विनंती करते की आपण आपले आंदोलन मागे घ्यावे.'

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :