कालीच्या भूमिकेत पूजा शर्मा

अरुण सुर्वे
बुधवार, 21 जून 2017

पूजा म्हणाली, ''मला देवी कालीविषयी असलेल्या अनेक गैरसमजुती महाकालीने दूर केल्या आहेत."

अभिनेत्री पूजा शर्मा हिने 'महाकाली... अंत ही आरंभ है' या पौराणिक मालिकेमध्ये कालीची भूमिका साकारली आहे. यासाठी पूजाने कालीमातेच्या विविध रूपांविषयी तसेच हिंदू संस्कृतीमधील महत्त्वाविषयी विविध पुस्तके व लेखांचे वाचन केले.

याबद्दल पूजा म्हणाली, ''मला देवी कालीविषयी असलेल्या अनेक गैरसमजुती महाकालीने दूर केल्या आहेत. काली ही पार्वतीचाच एक अवतार असल्याचे मला नंतर समजले. देवीविषयी लोकांच्या मनात असलेले प्रेम अन्‌ अनेक गोष्टींची माहिती झाली.

विशेष म्हणजे मला या मालिकेत वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळणार आहेत. एका बाजूला मी हिंसेचा आदर्श काली म्हणून दिसणार आहे, तर दुसरीकडे पार्वतीसुद्धा असणार आहे. त्यामुळे ही भूमिका रंगविण्यासाठी मी उत्सुक बनली आहे.''

सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
जिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार​
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
योगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी
कर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा
धोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड
रुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​
‘योगा’त रमले आयटीयन्स​
संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी
हीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी?​
#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद