नित्रुड येथे एकाचा खून; परिसरात खळबळ

file photo
file photo

माजलगाव (जि. बीड): कमलेश जाब्रस: तालुक्यातील नित्रुड येथे भागवत बाबुराव गायके (वय 40) यांचा माजलगाव तेलगाव रस्त्यावर डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज (सोमवार) सकाळी साडेआठ वाजता घडली आहे.

माजलगाव-तेलगाव या राज्य महामार्गावर नित्रुड येथील भागवय गायके हे शेतातून दुध आणण्यासाठी जात असताना माजलगांव तेलगाव रस्त्यावर त्यांच्या डाक्यात दगड घालून खून केल्याची घटना सकाळी साडेआठ वाजता घडली आहे. याप्रकरणी दिंदु्रड पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी हजर झाले आहेत.

दरम्यान, जुन्या भांडणातून खून झाल्याची चर्चा परिसरात होती. भागवत गायके यांच्या मागे पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com