मारहाण प्रकरण : दोन्ही महिला रेल्वे प्रवाशांत पोलिसांनी घडवला समेट

गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

लोकलमध्ये जागा पकडण्यावरून महिलेला मारहाण प्रकरण... महिला प्रवासी संघटनाच्या मध्यस्थीने रेल्वे पोलिसांनी दोन्ही रेल्वे स्थानकमधील महिला प्रवासी वर्गात समेट घडवून आणला... पुन्हा घटना घडल्यास कठोर कारवाईबाबत पोलिसांनी दिली समज...

कल्याण : बुधवारी लोकलमध्ये जागा पकडण्यावरून 54 वर्षीय डोंबिवली मधील महिलेला मारहाण प्रकरणात आज सकाळी दोन्ही स्थानकातील महिला गटाला समुपदेशन करून आवश्यक समज देऊन भविष्यात असे हाणामारीचे प्रकार प्रवासात उद्भवणार नाहीत याची काळजी घेण्याचे सांगून यापुढे असे प्रकार घडले तर यातील दोषींना कायदेशीररीत्या कडक कारवाई केली जाईल असा ही सज्जड दम दिला असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर पिंगळे यांनी 'सकाळ'ला दिली .

कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी 8.30च्या सुमारास मुबंईकडे जाणाऱ्या एक लोकलमध्ये महिला प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून हाणामारीची घटना घडली. कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये डोंबिवलीमधून बसून डाऊन-अप जाण्यासाठी (डोंबिली-कल्याण-मुबंई असा प्रवास करण्यासाठी) आधीच जागा अडवल्याचा राग आल्याने कल्याण स्थानकातील महिलांनी 

डोंबिवलीच्या चारुमती वेल्हाळ यांना कल्याणच्या महिलांनी मारहाण करत जागा सोडण्यासाठी धक्काबुकी केली. त्याची तक्रार मुंबई सीएसटीएम रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता , तो गुन्हा कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा वर्ग करण्यात आला , यावर आज गुरुवार ता 14 सप्टेंबर रोजी सकाळी कल्याण रेल्वे पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात कडेकोट बंदोबस्त लावला होता , ज्या महिला डब्यात मारहाण झाली त्या डब्यात पोलिसांनी जाऊन तेजस्वनी 

महिला प्रवासी संघटना अध्यक्षा लता अरगडे ,यांच्या मदतीने  ज्यांना मारहाण झाली त्या  चारुमती वेल्हाळ  आणि ज्यांनी मारहाण केली त्या महिलाना कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात नेण्यात आले , यावेळी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर पिंगळे यांनी दोन्ही बाजूकडील समस्या जाणून घेतल्या , कायदा सुवस्था बिघडेल असे वागू नका , ज्या समस्या आहेत त्या संबधित विभागाकडे मांडा , यावेळी पुन्हा घटना घडणार नाही याची लेखी हमी पत्र घेऊन सोडून देण्यात आल्याचे समजते .

त्या पीडित महिलेने महिला प्रवाशी संघटनाकडे तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला, आणि आज समेट ही झाला मात्र या घटना घडू नये यासाठी रेल्वे पोलीस , रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे प्रशासनने कठोर निर्णय घेतले पाहिजे यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकारी वर्गाची भेट घेऊन समस्या मांडणार असल्याची माहिती तेजस्वनी महिला प्रवासी संघटना अध्यक्षा लता अरगडे यांनी 'सकाळ'ला दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :