सांगलीत पोलिसावर आली मुलावर खुनाचा गुन्हा नोंदवण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

सांगली : यशवंतनगरजवळील अयोध्यानगर येथे मंगळवारी (ता. 25) भरदिवसा प्रथमेश महेंद्र तावडे (वय 17, अयोध्यानगर, शिवगंगा चौक) याचा चाकूने गळ्यावर वार करून खून झाला. त्याच्या दोन मित्रांनीच हा खून केला असून, मुख्य सूत्रधार संदीप संजय कांबळे (वय 19) हा पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. त्याचे वडील ज्या संजयनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत, त्याच हद्दीत हा खून झाल्याने मुलावर खुनाचा गुन्हा नोंदवण्याची वेळ पोलिसावर आली.

या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी हा अल्पवीयन (17 वर्षे) आहे. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का केला, याच्या चौकशीसाठी पोलिस उपाधीक्षक दीपाली कांबळे, तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक बोंदार आज सकाळपासून पोलिस ठाण्यात थांबून होते. त्यांनी प्राथमिक चौकशी गाडी आडवी का लावली, नजर रोखून का पाहिली, अशा किरकोळ कारणातून खून केल्याचे सांगितले आहे. यापेक्षा वेगळे कारण असल्याची शक्‍यता पडताळून पाहिली आहे.

अयोध्यानगर येथील छोट्याशा घरात प्रथमेश आई आणि लहान बहिणीसह रहात होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई घर सांभाळत होती. प्रथमेश विलिंग्डन महाविद्यालयात शिकत होता. बारावीला (एमसीव्हीसी) त्याचा एक विषय राहिला होता. त्यामुळे सध्या तो घरीच होता. त्याचा अल्पवयीन मित्र आणि संजय कांबळे हे दुचाकीवरून घराजवळ आले. घरापासून काही अंतरावर दोघांनी प्रथमेशला शिवीगाळ केली. वाद वाढला आणि एकाने चाकू प्रथमेशच्या गळ्यात भोसकला. दुसरा वार खांद्यावर केला. प्रथमेशच्या गळ्यातून रक्ताची धार लागल्यानंतर तो खाली पडला. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र भिंगारदेवे यांच्यासह पथकाने तातडीने रात्रीत तपासाला गती दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

टॅग्स