शाळेत शिकताना वेगळाच इतिहास शिकविला गेला: शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

पुणे - "शाळेत शिकत असताना वेगळाच इतिहास शिकविला गेला. तर विशिष्ट वर्गाने त्यांना सोयीचे असलेले ज्ञान देण्याची खबरदारी घेतली. त्यामुळे बहुजन समाजातील काही पिढ्या वेगळ्या इतिहासाची मांडणी करण्यात गेल्या. आता कुठे हळूहळू वस्तुनिष्ठ इतिहास समोर येऊ लागला आहे,'' असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे केले. 

श्रीमंत कोकाटे लिखीत "छत्रपती शिवाजी महाराज या सचित्र चरित्राचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. छत्रपती शाहू महाराज अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, पी. ए. इनामदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रविण गायकवाड उपस्थित होते. 

पवार म्हणाले, "राज्य चालवताना शिवाजी महाराजांनी संकुचित विचार ठेवला नाही, तरीही शाळेत छत्रपतींचा इतिहास वेगळा शिकवण्यात आला. "गोब्राह्मण प्रतिपालक' हा शब्दप्रयोग अनैतिहासिक असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक शेजवलकरांनी सिद्ध केले, तर महात्मा फुले यांनी "कुळवाडी भूषण'मधून वास्तव दाखवून दिले. मात्र काही जण जाणीवपूर्वक वेगळा इसिहास लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात त्यांना यशही येत आहे. ही गोष्ट अस्वस्थ करणारी असून वास्तव इतिहास लोकांपुढे आणला गेला पाहिजे.'' 

"सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचा नाश' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे सूत्र होते. जातीवाचक विचार न करता स्वराज्यावर निष्ठा ठेवणाऱ्या सर्व घटकांना त्यांनी एकत्र केले. या देशात अनेक राजे-महाराजे होऊन गेले. त्यांची राज्ये ही त्या राजांच्या नावानी ओळखली गेली. मात्र शिवाजी राजांचे राज्य कधी "भोसल्यां'चे राज्य झाले नाही. ते नेहमी रयतेचे राज्य म्हणूनच नावाजले गेले,'' असेही त्यांनी स्पष्ट केले. 
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ""सन 2004 मध्ये दादोजी कोंडदेवांचा विषय ऐरणीवर आला होता. त्यावेळी मी इतिहासाच्या पुनर्मांडणीची गरज व्यक्त केली होती. दादोजी कोंडदेव, रामदास यांना शिवाजीचे गुरु म्हणून दाखवणे चुकीचे आहे. स्वातंत्र्याचा सर्वात मोठा संस्कार शहाजी राजांनीच शिवाजी महाराजांवर केला.'' 

कोकाटे म्हणाले, "इतिहास रमण्यासाठी नसून प्रेरणा घेण्यासाठी असतो. या भूमिकेतून वस्तुनिष्ठ इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे.'' प्रास्ताविक प्रविण गायकवाड यांनी केले, तर राहूल पोकळे यांनी आभार मानले. 

छत्रपतींची लढाई मुस्लिमविरोधी नाही 
"अफझलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला ही वस्तुस्थिती आहे. मात्र, तो स्वराज्याचा शत्रू होता आणि राज्य उध्वस्त करायला तो आला होता म्हणून त्याला नष्ट केले; मुसलमान म्हणून नव्हे. शिवाजी महाराज मुस्लिमद्वेष्टे असते तर अफझलखानाचा वकील कृष्णाजी कुलकर्णी सुटला असता. छत्रपतींची लढाई मुस्लिमविरोधी नाही. रयतेच्या राज्यावर चालून येणाऱ्या हिंदु, नात्या- गोत्यातल्या लोकांविरुद्धही त्यांनी संघर्ष केला,'' असेही शरद पवार यांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः
कुंबळेंसारखा मेहनत करुन घेणारा प्रशिक्षक यांना नको: गावसकर बरसले

रामनाथ कोविंद यांना 'जदयू'चा पाठिंबा
जिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार​
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

योगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी
कर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा
धोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड
रुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​
‘योगा’त रमले आयटीयन्स​
संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी
हीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी?​
#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com