धुळेः पोलिस निरीक्षक देविदास भोज यांना लाच घेताना पकडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

धुळेः शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास भोज यांना लाचलूचपत प्रतिबंथक विभागाने 1500 रुपयांची लाच घेताना आज (बुधवार) पकडले. या कारवाईने एकच खळबळ उडाली.

शेवाळी (ता.शिंदखेडा) येथील तक्रारदाराला चार्जशीटची झेरॉक्स हवी होती. त्यासाठी वारंवार पोलिस ठाण्यात मागणी करुनही झेरॉक्स मिळत नव्हती. तक्रारदाराने निरीक्षक भोज यांची भेट घेऊन चार्जशीट झेरॉक्सची मागणी केली. ती देण्यासाठी निरीक्षक भोज याने तक्रादाराकडे 1500 रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

पोलिस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्यासह जितेंद्र परदेशी, प्रशांत चौधरी, संदीप सरग, संतोष हिरे, सुधीर सोनवणे व पथकाने सापळा रचून शिंदखेडा येथील भुषण हॉटेलच्या रुम नं. 4 मधून निरीक्षक भोजला पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. दरम्यान, धुळे जिल्ह्यात भोज यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

टॅग्स