मुलाला गावात मुरूम टाकण्याचे काम दिल्याने ग्रा. प. महिला सदस्य अपात्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

जळगाव: मुलाला गावात रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम दिल्याने पदाचा दुरूपयोग करून स्वत:चा फायदा केल्याप्रकरणी जळगाव तालुक्‍यातील कुसूंबा खुर्द येथील वंदना प्रल्हाद राणे यांना ग्रापंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर यांनी हा निकाल दिला आहे.

जळगाव तालुक्‍यातील मौजे कुंसूबा खुर्द येथील चंद्रकांत भाऊलाल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती, यात त्यांनी म्हटले होते. ग्रामपंचायत सदस्या सौ. वंदना प्रल्हाद राणे यांनी त्यांचा मुलगा हर्षद राणे याला गावात रस्त्यावर मुरूम टाकण्याच्या काम दिले आहे. तो अविवाहीत असून एकत्रीत राहत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम कलम 14(ग) नुसार त्यांनी सदस्यपदाचा दुरूपयोग करून स्वत:चा फायदा केल्यामुळे तसेच त्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हितसंबध केल्यामुळे त्यांचे सदस्यपद रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर यांच्याकडे त्याची सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणी वंदना राणे यांनी आपल्या मुलामार्फत ग्रामपंचयातीचे काम करून सदर कामात अप्रत्यक्षरित्या हितसंबध निर्माण केल्याचे सिध्द झाल्याने त्याना ग्रामपंचयात सदस्यपदावरून अपात्र घोषित करण्यात आले. 13 जुलैला जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकाल दिला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: