अकोला: एसटी आगाराला पंधरा लाखांचे उत्पन्न

सुगत खाडे
शनिवार, 15 जुलै 2017

अडीच लाखांनी वाढले उत्पन्न
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पंढरपूर यात्रेतून मध्यवर्ती आगाराला दाेन लाख ५३ हजार १९ रुपयांचे जास्त उत्पन्न मिळाले. त्याचप्रमाणे आगाराच्या बस गाड्यांनी सात हजार ९१८ किलाे मिटर अतिरीक्त प्रवास केला.

अकाेला : आषाढी एकादशी निमीत्य विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपुरला लाखो भाविक जातात. स्थानिक मध्यवर्ती आगार क्रमांक दाेनमधून सुद्धा यात्रेसाठी यावेळी भक्तांसाठी पढंरपूर यात्रेकरिता एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या बसगाड्याच्या फेऱ्यांमधून आगाराला १४ लाख ३२ हजारांचे उत्पन्न प्राप्त झाले.

पंढरपूर यात्रेकरुंसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्थानिक मध्यवर्ती आगार क्रमांक दाेन येथुन विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात येत असते. त्या अंतर्गत यावर्षी जून महिन्याच्या शेवटपासून आषाढी एकादशीपर्यंत एसटीच्या गाड्या पंढरपूरसाठी सोडण्यात आल्या. बसस्थानकातून दररोज साेडण्यात आलेल्या फेऱ्या व मध्यवर्ती आगाराच्या गाड्यांनी पंढरपूर ते पुणे व पंढरपूर ते रिंगण फेऱ्या केल्या. त्यामुळे आगार क्रमांक दाेनच्या सगळ्या गाड्यांचा प्रवास ५० हजार ९७२ किलोमिटरचा झाला. त्यातुन एसटीला १४ लाख ३२ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले.  मध्यवर्ती बस स्थानकांच्या गाड्यांमधून साेडण्यात आलेल्या गाड्यांतून नऊ हजार ७९१ प्रवाशांनी यात्रा केली. त्यामुळे सर्व गाड्यांचे भारमान ६१ टक्के काढण्यात आले. त्याचप्रमाणे स्थानकाला २८ रूपये ०९ पैसे प्रति किलाेमिटर उत्पन्न मिळाले.

अडीच लाखांनी वाढले उत्पन्न
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पंढरपूर यात्रेतून मध्यवर्ती आगाराला दाेन लाख ५३ हजार १९ रुपयांचे जास्त उत्पन्न मिळाले. त्याचप्रमाणे आगाराच्या बस गाड्यांनी सात हजार ९१८ किलाे मिटर अतिरीक्त प्रवास केला. आगाराच्या बस गाड्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत १० फेऱ्या जास्त केल्यामुळे उत्पन्नात ०.७१ पैसे प्रति किलाेमिटरने वाढ झाली. पंढरपुर यात्रेकरीता विभाग नियंत्रक राेहण पलंगे यांच्या मार्गदर्शनात आगार व्यवस्थापक एन.आर. धारगावे, वाहतुक निरीक्षक, आगारातील चालक व वाहक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :