अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे त्यांच्या मतदारसंघामध्ये सातत्याने फिरत असतात. तसेच जनतेसोबत थेट संवाद साधत असतात. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरे देखील झाले होते.
मात्र, आता दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये ते सहभागी झाले होते. तसेच त्यासाठी त्यांनी बाईकवरून अमरावती ते दिल्ली असा प्रवास केला होता. दिल्लीवरून परतल्यानंतर ते त्यांच्या मतदारसंघात फिरून आढावा घेत होते. तसेच अकोल्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी स्वतःची चाचणी करावी व काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती दिली.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांचेही अनेक ठिकाणी संवाद यात्रा आणि दौरे होते. तसेच गुरुवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली.
अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा
संपादन - विवेक मेतकर
अधिक वाचा -
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.