Akola Corona News Vaccine theft case at Chatari Rural Hospital in Patur taluka is under investigation 
अकोला

कुणी चोरली ग्रामीण रुग्णालयातील कोरोनाची लस?

सकाळ वृत्तसेेवा

चतारी (जि.अकोला) :  ग्रामीण रुग्णालयातील लस चोरी प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार चतरी येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन चौकशी करण्यात आली.

हेही वाचा - Lockdown Breaking: रविवारी राहणार संपूर्ण लॉकडाउन…!

अकोला आरोग्य विभागाकडून ग्रामीण रुग्णालय चतारी येथे ता. ५ फेब्रुवारीपासून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. त्यासाठीई पहिल्या टप्प्यामध्ये ५० तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ५० अशाप्रकारे १०० लसी रुग्णालयांमध्ये आणण्यात आल्या होत्या.

दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेल्या पन्नास लसींपैकी सात लसी चतारी ग्रामीण रुग्णालयातून गहाळ झाल्याची तक्रार चान्नी पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. ता. १६ फेब्रुवारी रोजी तक्रार दिल्यानंतर ता.१७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी समिती नियुक्त करून चौकशी सुरू केली. समितीतील दोन कर्मचाऱ्यांनी रुग्णालयामध्ये येऊन चौकशी केली. या चौकशीत एका रूममध्ये असलेल्या फ्रिजमधील सात कोरोना व्हॅक्सिन गहाळ झाल्याचे आढळून आले.

हेही वाचाधक्कादायक; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह


घरचाच अहेर असल्याची चर्चा
रुग्णालयातील सात लस एका कर्मचाऱ्यांने बाहेर नेऊन त्याचा वापर केला असल्याची चर्चाही रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
 

लस चोरी प्रकरणी चौकशी सुरू असून, या चौकशीमध्ये एका व्यक्तीचे नाव समोर आले आहे. त्या व्यक्तीची कसून चौकशी पोलिस करीत असून, तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
-डॉ. राजकुमार चव्हाण, उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT