Akola Marathi News Farmers get Rs 25 crore stuck in government coffers due to Gram Panchayat elections 
अकोला

ग्रामपंचायत निवडणूकीमुळे शेतकऱ्यांचे 25 कोटी रुपये अडकले सरकारच्याच तिजोरीत

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दुसऱ्या व अंतिम हप्त्याचे २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

या निधीचे विभाजन करून निधी तहसीलदारांच्या निधी खात्यात वळती करण्यात आला आहे. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमित सदर मदत निधीचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले नाही. त्यामुळे अद्यापही शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहेत.

हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?

यावर्षी झालेल्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले. सोयाबीनसह, तूर, कपाशीला सुद्धा अति पावसाचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे कपाशीचे बोंड काळे पडले. झाडांची पडझड, बगीचातील फळ गळून पडल्याने बागायती शेतीचे सुद्धा चांगलेच नुकसान झाले.

त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. परिणामी जिल्ह्यातील नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आल्यानंतर शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान मदत निधीच्या दुसऱ्या हप्त्याचे २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला जानेवारी महिन्याच्या सुरूवातीलाच मिळाले. त्याचे विभाजन करून निधी तहसीदारांच्या खात्यात वळती करण्यात आला आहे. परंतु शेतकरी मात्र अद्यापही मदतीपासून वंचितच आहेत.

हेही वाचा - अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!

तालुकानिहाय वाटप करण्यात आलेला निधी
तालुका वितरीत निधी
अकोला ५ कोटी ६६ लाख ३ हजार
बार्शीटाकळी १ कोटी ४२ लाख ९५ हजार
अकोट ५ कोटी १८ लाख २२ हजार
तेल्हारा ३ कोटी १८ लाख ७ हजार
बाळापूर ६ कोटी २९ लाख ६९ हजार
पातूर १ कोटी ६० लाख ३५ हजार
मूर्तिजापूर २ कोटी ४३ लाख ४१ हजार
एकूण २५ कोटी ७८ लाख ७२ हजार

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT