Akola Marathi News Hivarkhed Gram Panchayat results; 15 out of 17 new members were elected for the first time 
अकोला

Gram Panchayat Result : विदर्भातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचा धक्कादायक निकाल; १७ पैकी १५ नवीन सदस्य प्रथमच आले निवडून

धीरज बजाज

हिवरखेड (जि.अकोला) :  विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकोला जिल्ह्यातील हिवरखेड रुपराव ग्रामपंचायतचा धक्कादायक निकाल लागला आहे. येथील मतदारांनी परिवर्तनाच्या हेतूने नवीन युवा सदस्यांना पसंती दिली असून, १७ पैकी १५ नवीन सदस्य पहिल्यांदाच निवडून आले आहेत.


मागील पाच वर्षासाठी निवडून आलेल्या एकूण १७ सदस्यांपैकी नऊ सदस्य पुन्हा यावेळी स्वतः उभे होते तर एखादा अपवाद वगळता इतर सर्व सदस्यांच्या घरचे जवळचे नातेवाईक निवडणुकीत उभे होते.

हेही वाचा - कोरोना लसीकरणानंतर दोन महिलांना आली रिॲक्शन!

परंतु मतदारांनी मागील सदस्यांमधून फक्त नसरीन खातून या एकाच महिला सदस्याला पुन्हा निवडून दिले. इतर सर्व नवीन सदस्य निवडून दिले. सुनंदा सुरेश गिर्हे यांना सर्वाधिक १०३४ मते मिळाली. तर सर्वात युवा म्हणून २२ वर्षीय आचल सुरेश ओंकारे ही युवती निवडून आली.
हिवरखेड ग्रामपंचायत निकालाकडे संपूर्ण अकोला जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते.

येथील वार्ड क्रमांक दोनमध्ये आमदारकीचे २ तगडे दावेदार श्यामशील भोपळे आणि रमेश दुतोंडे यांच्यात सरळ लढत झाली. ज्यामध्ये रमेश दुतोंडे विजयी झाले. गिर्हे- भोपळे-ओंकारे-मिरसाहेब प्रणित जयकीसान मित्र शक्ती पॅनलचे सात उमेदवार निवडून आले. ‘प्रहार’चे पाच उमेदवार निवडून आले तर दुतोंडे जमीर खाँ पठाण गटाचे चार सदस्य निवडून आले.

हेही वाचा - आमदार अमोल मिटकरी यांच्या गावात ग्रामस्वराज्य पॅनलचा उधळला गुलाल

सुनील इंगळे हे शेतकरी पॅनलमधून निवडून आले. ‘प्रहार’ने मजल मारीत ५ सदस्य निवडून आणल्याने ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आता जवळपास सर्वच सदस्य नवीन निवडून आल्यामुळे हिवरखेडवासियांना झपाट्याने विकास होईल अशी आशा अपेक्षा लागली आहे. सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे आता नवीन सरपंच पदाचे आरक्षण काय निघते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून हिवरखेड चा नवीन सरपंच कोण ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कोणत्याही एका गटाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने आता कोणाची युती होते आणि कोणत्या गटाचा सरपंच होतो याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! मतमोजणी सुरू असतानाच सख्ख्या चुलत भावाने केला चाकू हल्ला

अनेक दिग्गज पराभूत
सौ. शिल्पाताई मिलिंद भोपळे, सौ. प्रतिभाताई वीरेंद्र येऊल, श्री. अ. सादिक अ. सलाम, श्री. सुरेश वसंतराव ओंकारे या चार माजी सरपंचासह श्री श्यामशील सहदेवराव भोपळे, सौ.वंदनाताई राजेश वानखडे, श्री अजीज खा जमीर खा, श्री. पंकज एकनाथ तिडके, सौ चंद्रकलाबाई सेवकराम मोरोकार, अशा एकूण आठ विद्यमान सदस्यांचा पराभव झाला आहे. पं. स. माजी सभापती मधुकरराव पोके यांचा सुद्धा पराभव झाला. इतर अनेक विद्यमान सदस्यांच्या आणि माजी सरपंचाच्या कुटुंबीयांचाही पराभव झाला.

हेही वाचा - शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या मुळ गावी मदाणी ग्रामपंचायतवर फडकविला झेंडा

हिवरखेडचे विजयी उमेदवार
- वार्ड क्र.१मधून सौ सुनंदाताई गिऱ्हे
सौ वैशाली गणेश वानखडे
श्री गजानन बंड
- वार्ड क्र,२ मधून श्री. रमेश दुतोंडे
श्री वसीम बेग मिर्झा
सौ अनिता रवींद्र वाकोडे
- वार्ड ३ मधून श्री रवी घुंगड
सौ नंदा अरुण मानकर
- वार्ड ४ मधून कु. आचल सुरेश ओंकारे
श्री. सुनील इंगळे
श्री रज्जाक भाई
- वार्ड ५ मधून सौ सीमा राऊत
सौ कृतिका ढबाले
श्री. मंगेश ताळे
- वार्ड ६ श्री. कामील अली मिरसाहेब
सौ वेणूताई इंगळे
सौ. नसरीन अ.सादिक

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT