Akola News Four more killed; A high of 479 new patients were found 
अकोला

आणखी चौघांचा बळी; उच्चांकी ४७९ नवे रुग्ण आढळले

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात गुरुवारी (ता. ४) चार रुग्णांचा मृत्यू झाला. याव्यतिरीक्त ४७९ नवे रूग्ण आढळले. आतापर्यंत आढळेल्या रूग्णांच्या संख्येत हा आकडा सर्वाधिक असल्याने कोरोनाचे भय अधिक गडद झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी कोरोनावर मात करणाऱ्या २५६ जणांना रूग्णालयातून गुरुवारी (ता. ४) डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.
कोरोना संसर्ग तपासणीचे गुरूवारी (ता. ४) आरटीपीसीआर व रॅपिड ॲंटिजेन चाचणीचे २ हजार २२७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी सकाळी २८२, सायंकाळी १४२ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासोबतच बुधवारचे ५५ रॅपिडचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त चार रूग्णांचा मृत्यू सुद्धा झाला. त्यात पहिला मृत्यू ७६ वर्षीय पुरुष रुग्णाचा झाला. ते अंबिका नगर, खदान, अकोला येथील रहिवाशी होते. त्यांना १ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू तापडीया नगर येथील रहिवाशी असलेल्या ७२ वर्षीय महिला रुग्णाचा झाला. सदर महिलेस १ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. तिसरा मृत्यू सायंकाळी चान्नी ता. पातूर येथील रहिवाशी ६५ वर्षीय पुरुषांचा झाला. त्यांना २४ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. चौथा मृत्यू ६८ वर्षीय पुरुष रुग्णाचा झाला. ते गोरक्षण रोड, अकोला येथील रहिवाशी होते. त्यांना २५ फेब्रुवारी रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर चार मृत्यूनंतर आता जिल्ह्यापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात ३७८ जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------------


या भागात आढळले नवे रूग्ण
गुरुवारी सकाळी २८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ११९ महिला व १६३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर येथील ४०, पारस येथील १४, डाबकी रोड येथील १६, कौलखेड, बार्शीटाकळी व खडकी येथील प्रत्येकी ११, मोठी उमरी येथील १०, पातूर येथील ९, जीएमसी व ऊरळ खु. येथील प्रत्येकी ८, जठारपेठ व खोलेश्वर येथील प्रत्येकी ६, राम नगर, रामदासपेठ, व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी ४, खेडकर नगर, रजपूतपुरा, आदर्श कॉलनी, रतनलाल प्लॉट, म्हैसांग, तापडीया नगर, मलकापूर, अकोट, सिंधी कॅम्प, बाळापूर व जुने आरटीओ येथील प्रत्येकी ३, गर्ल्स हॉस्टेल, कळबेंश्वर, मनकर्णा, गजाननपेठ, अखातवाडा, किन्हकिनी, कोठारी नगर, न्यू खेतान नगर, तेल्हारा, पोपटखेड, पातूर, म्हातोंडा, वडगाव मेंडे, नयगाव, समता नगर, येदलापूर व जामठी बु. येथील प्रत्येकी २, तर उर्वरित यलवन, अकोट फैल,गजानन पेठ, शिवर, विठ्ठल नगर, दगडपूल, जीएमसी हॉस्टेल, सागर कॉलनी, समता नगर, कॉग्रेस नगर, तारफैल, माधव नगर, आदर्श कॉलनी, न्यू तापडीया नगर, खदान, जुने शहर, श्रध्दा नगर, दुर्गा चौक, देहगाव, आपातापा, कापसी, दहिखेड ता.अकोट, गायत्री नगर, नखेगाव ता. अकोट, भागवतवाडी, गोकूल कॉलनी, सहकार नगर, इसीएचएस हॉस्पीटल, रणपिसे नगर, गड्डम प्लॉट, रणपिसे नगर, दहिहांडा, अंदुरा, मांजरी, वाशिम बायपास, महाजनी प्लॉट, शिवनी, गोडबोले प्लॉट, हनुमान वस्ती, तुकाराम चौक, केशवनगर, रागीनी वर्कशॉप, टॉवर चौक, शिवाजी नगर, अयोध्या नगर, वानखडे नगर, सिसा बोदरखेड, लहान उमरी, हमता प्लॉट, राजूरा घाटे, विद्या नगर, निता गेस्ट हाऊस व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहे. सायंकाळी १४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ५० महिला व ९२ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मूर्तिजापूर येथे २१, अकोट येथील १६, बार्शीटाकळी येथील १५, डाबकी रोड येथील १०, उकडी बाजार येथील आठ, गोरक्षण रोड व पातूर येथील प्रत्येकी सात, कुरुम येथील पाच, कौलखेड व जीएमसी येथील प्रत्येकी चार, रामनगर, बुरड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, सस्ती, तुकाराम चौक, खोलेश्वर, न्यू तापडीया नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित न्यू महसूल कॉलनी, कारला, व्हीएचबी कॉलनी, शिवसेना वसाहत, रजपूतपुरा, न्यू राधाकिशन प्लॉट, धोतर्डी, अकोट फैल, खदान, जाफराबाद, गोरवा, गणेश नगर, जुने शहर, शास्त्री नगर, गीता नगर, अनभोरा, गंगा नगर, दगडी पूल, पंचशिल नगर, माधव नगर, माळेगाव बाजार, बालाजी नगर, सांगवी बाजार, राम नगर, सोनाळा व सिव्हील लाईन येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहे.
--------------
कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - १७९२५
- मृत - ३७८
- एकूण डिस्चार्ज १३४१८
- ॲक्टिव्ह रूग्ण - ४१२९

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'जरांगे-पाटील यांच्याशी आमचा कवडीचा संबंध नाही'; शरद पवारांनी नाशिकमध्ये दिले स्पष्टीकरण

IND vs PAK : सूर्यकुमार यादव भाजपा प्रवक्ता... Asia Cup मध्ये लाज निघाल्यावर टीम इंडियाच्या कॅप्टनवर पाकिस्तानकडून नको ते आरोप; कोण म्हणतंय असं?

अरे हे चाललंय तरी काय! पुन्हा बदलली झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची वेळ? नेटकऱ्यांनीच दाखवला फोटो

Sharad Pawar : ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली’, आरक्षणावरुन शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Hug My Younger Self स्टाईलचा फोटो बनवा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT