Akola Washim Corona News Two hundred corona infected in eight days 
अकोला

अबब! आठ दिवसात तब्बल पावणे दोनशे कोरोना बाधीत

सकाळ वृत्तसेेवा

वाशीम : मागील वर्षी कोरोनाने संपूर्ण अर्थचक्र ठप्प केल्यानंतर गेल्या तीन महिन्यात दिलेली ढिलाई आता, जिल्हावासियांसाठी काळजीचे कारण बनत चालली आहे. गेल्या आठ दिवसात तब्बत पावणे दोनशे नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमरावती व अकोला या शहरातील लोकसंख्या तसेच वाशीम जिल्ह्यातील लोकसंख्या व बाधितांची संख्या याचा विचार केला, तर भयावह परिस्थिती समोर येत आहे. दोन दिवसांपासून पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाया सुरू केल्या असून, नगरपालिकेने भाजीबाजार बंद केला आहे. कारवाया सुरू असल्या, तरी पुरेसे गांभीर्य नसल्याने अजूनही लोक विना मास्क फिरत असून, प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.


गेल्या आठ दिवसात जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस. यांनी परिस्थिती आढावा घेवून, रात्रीची संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी सकाळी ७ वाजतापासून कारवायांचा धडाका लावून शहरातील भाजी बाजार बंद केला. ग्रामीण भागामध्ये तलाठी, ग्रामसेवक व पोलिस पाटलांकडे लग्न समारंभात नियमा पेक्षा जास्त गर्दी होवू, नये याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिकांमध्ये अजूनही गांभीर्य नसल्याने उपाययोजना कडक केल्या नाही, तर पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ येवू शकते.

शहरामधील हॉटेल, पानटपरी व रसवंत्यावर अजूनही गर्दी होत आहे. दुकानमालक, स्वत: मास्क वापरत नसल्याचे चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास मज्जाव केला असताना, या नियमांचीही पायमल्ली कैल्या जात आहे. पोलिस प्रशासनावरच कारवाईची मदार असल्याने प्रशासनाने इतर विभागही मदतीला घेवून कोरोनाचा संसर्ग रोखण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हेही वाचा - धोका वाढला; रविवारी संपूर्ण दिवसभर तर दररोज रात्रीची संचारबंदी

भाजीबाजार झाला बंद
शहरामध्ये महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये दैनंदिन भाजीबाजार भरतो. कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पालिकेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांच्या पथकाने सकाळीच भाजीबाजार गाठून हा बाजार बंद केला. बाजाराच्या विकेंद्रीकरणाच्या सूचना असल्याने आर.ए. कॉलेज परिसरात सामाजिक अंतर राखून भाजीबाजार भरविला जात आहे.

हेही वाचा -  धक्कादायक; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह

शहरातील गर्दी ओसरली
अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत असताना, वाशीम जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढीस लागली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वाशीम जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत, तसेच रुग्ण संख्या वाढत असल्याने गर्दीवरही आपोआप नियंत्रण होत आहे. शहरातील रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसून येत असल्याचे चित्र आहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT