Akola Washim News Transformation of Residential School into Covid Care Center, Health of All Affected Students Stable 
अकोला

निवासी शाळेचे कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर, सर्व बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

सकाळ वृत्तसेवा

वाशीम  : रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका निवासी शाळेतील ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले. त्यानंतर जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी बुधवारी (ता.२४) तातडीने शाळेला भेट देवून बाधित विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या.

शाळेच्या वसतिगृहाची इमारत आता कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनीही गुरुवारी (ता.२५) शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला. सर्व बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


देगाव येथील संबंधित शाळेत आजूबाजूच्या जिल्ह्यातून विद्यार्थी दाखल झाले. कोरोना चाचणी केल्यानंतरच शाळा सुरू करण्याचे ठरल्याने शाळा सुरू होण्यापूर्वी वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये २२९ विद्यार्थी, तसेच ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत या विद्यार्थ्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी बुधवारी (ता.२४) स्वतः शाळेला भेट कोरोना बाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार व इतर आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत सूचना केल्या. या सर्व कार्यवाहीवर देखरेख ठेवण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली. शाळेमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली असून, त्यांच्यामार्फत बाधित विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी होत आहे.

बुधवारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील तज्ज्ञ डॉक्टरांनी सर्व बाधित विद्यार्थ्यांची तपासणी केली असून, काही विद्यार्थ्यांना सर्दी असून इतर कोणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत. गुरुवारी (ता.२५) जिल्हा सामान्य रुग्णालयातील छातीचे चिकित्सकतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांसह इतर स्पेशालिस्ट डॉक्टरांनी सर्व बाधित विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा आरोग्य तपासणी केली आहे. शाळा कोविड केअर सेंटर घोषित करण्यात आले असून, शाळा व वसतीगृहाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament canteen: संसदेच्या कँटीनमध्ये किती रुपयांना मिळतं जेवण? विविध पदार्थांचे दर काय? व्हेज-नॉनव्हेज थाळ्यांच्याही किंमती वाढल्या

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Mumbai News: जुहू समुद्रकिनाऱ्यावर यांत्रिक जाळी, सागरी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

Latest Marathi News Live Update : खड्डे अपघातात जीव गमावलेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांचं महापौरांनी केलं सांत्वन

Pachod News : नांदरमध्ये २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली; परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT