breaking akola news fire lakkdgang akola Three houses with four shops on fire 
अकोला

 लक्कडगंजमध्ये अग्नितांडव; चार दुकानांसह तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : शहरातीलमध्य वस्तीत येणाऱ्या लक्कडगंज येथे शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत चार दुकाने व तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली. मात्र, अग्निशमन दलाच्या दिरंगाईमुळे आग विझवण्यास विलंब झाल्याने नुकसान झाले आहे.

लक्कडगंज येथे लाकडाचे काम होत असल्याने आगीने भीषण रूप धारण करून येथील विदर्भ टिंबर, दुर्गेश टिंबर मर्चंट, डेहनकर टिंबर मार्ट, नूर अहेमद टिंबर मर्चंट ही चार दुकाने व तीन घर या आगीच्या भक्ष्यस्थानी आले. या दुकानातील साहित्य आणि बाकी चार घरातील साहित्य जळून खाक झाल्याने अंदाजे ४० ते ४५ लाखाचे नुकसान झाले. ही आग ही शॉक सर्किटने लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग एवढी भीषण होती की या आगीच्या ज्वाला बऱ्याच दुरून दिसत होत्या.

अग्निशामक दलाची दिरंगाई-
आग लागल्याची घटना घडताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन केला असता, बऱ्याच वेळानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याकरिता सहा बंब लागले. तरी किमान १५ मिनिटाच्या अंतरावर एक एक बंब घटनास्थळी पोहोचल्याने आग विझवण्यास विलंब झाला. अग्निशमन दलाच्या या ढेपाळलेला कारभारामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला.

अकोला शहरातील लक्कडगंजमध्ये अग्नितांडवातील नुकसान ग्रस्त
अग्निशमन दलाचे अपुरे कर्मचारी आणि लागलेली भीषण आग यात स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले नसते तर परिसरातील नागरिकांना भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले असते. अकोल्यातील मध्यवस्तीत लागलेल्या आगीने एवढा मोठा तांडव केला असता देखील महानगर पोलिकेचा कोणीच अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नाही. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने व रामदास पेठ पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. नेमकी आग कशाने लागली याचा तपास सुरू आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC निवडणुकांचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला! ८०% कर्मचारी निवडणूक ड्युटीवर, मतदान महत्त्वाचे की उपचार?

Latest Marathi News Live Update : नवी दिल्लीत 'दहशतवादविरोधी परिषद-२०२५' चे उद्घाटन

Viral Video: ''ले बेटा.. किरीश का सुनेगा गाना'', तुम्ही व्हिडीओ बघितला का? कोण आहे तो व्हायरल बॉय?

Akola Political : अकोल्यात भाजप व काँग्रेसची ‘बार्गेनिंग’ वाढली; फॉर्म्युला ठरेना; उमेदवारांची धाकधुक वाढली!

Dream Job Loss: अपयश नाही, नवी संधी! स्वप्नातील नोकरी गेल्यावर नव्याने सुरुवात कशी कराल? 'या' टिप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT