Pension Esakal
अर्थविश्व

Atal Pension Yojna: या योजनेत मिळू शकते10 हजार रुपये मासिक पेन्शन

कमी गुंतवणुकीत पेन्शनची गॅरंटी देण्यासाठी ही योजना अधिक उत्तम.

सकाळ डिजिटल टीम

कमी गुंतवणुकीत पेन्शनची गॅरंटी देण्यासाठी ही योजना अधिक उत्तम.

आर्थिक अनिश्चिततेच्या काळात बहुतांश लोक रिटायरमेंटनंतर प्लॅनिंग करत राहतात. खासगी नोकरी किंवा छोट्या व्यावसायिक लोकांना वृद्धापकाळाच्या खर्चाची चिंता असते. तुम्हीही रिटायरमेंटनंतर पेन्शनचा (Pension) विचार करत असाल तर अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojna) तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.

कमी गुंतवणुकीत पेन्शनची गॅरंटी देण्यासाठी ही योजना अधिक उत्तम. सध्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार 60 वर्षांनंतर महिन्याला एक हजार ते पाच हजार रुपये पेन्शनची गॅरंटी देते.म्हणजेच वार्षिक 60 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. पती-पत्नी दोघेही गुंतवणूक (Investment) करत असतील तर दोघांनाही पेन्शन मिळू शकते. म्हणजेच तुम्ही 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर वर्षाला 1 लाख 20 हजार रुपये आणि मासिक 10 हजार रुपये पेन्शन मिळेल. सरकारच्या या योजनेसाठी 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते. चला तर मग जाणून घेऊया अटल पेन्शन योजनेचे फायदे.

60 वर्षानंतर तुम्हाला वार्षिक 60 हजार रुपये पेन्शन मिळेल

अटल पेन्शन योजनेचा उद्देश प्रत्येक घटकाला पेन्शनच्या कक्षेत आणणे हा आहे. मात्र, 'पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी'ने (PFRDA) अटल पेन्शन योजनेत (APY) कमाल वय वाढविण्याची शिफारस सरकारकडे केली आहे.

या योजनेअंतर्गत दरमहा खात्यात निश्चित अंशदान केल्यास निवृत्तीनंतर दरमहा एक हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार आहे. दर सहा महिन्यांनी केवळ 1 हजार 239 रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी सरकार दरमहा पाच हजार रुपये म्हणजे वयाच्या 60 वर्षानंतरच्या आयुष्यासाठी वार्षिक 60 हजार रुपये पेन्शनची गॅरंटी देत आहे.

दरमहा 210 रुपये द्यावे लागतात.

सध्याच्या नियमानुसार मासिक पेन्शनसाठी वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत जास्तीत जास्त 5 हजार रुपये जोडले गेल्यास तुम्हाला दरमहा 210 रुपये भरावे लागतील. हेच पैसे दर तीन महिन्यांनी दिले तर 626 रुपये आणि सहा महिन्यांत 1 हजार 239 रुपये भरावे लागतील. महिन्याला एक हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी वयाच्या 18व्या वर्षी गुंतवणूक केल्यास दरमहा 42 रुपये भरावे लागतात.

लहान वयात सहभागी होऊन मिळतील अधिक लाभ

तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी पाच हजारांच्या पेन्शनसाठी रुजू झालात, तर 25 वर्षांसाठी दर 6 महिन्यांनी 5 हजार 323 रुपये जमा करावे लागतील. अशा परिस्थितीत तुमची एकूण गुंतवणूक 2.66 लाख रुपये असेल, ज्यावर तुम्हाला मासिक पेन्शन 5000 रुपये मिळेल. वयाच्या 18 व्या वर्षी अॅड केल्यावर तुमची एकूण गुंतवणूक फक्त 1.04 लाख रुपये होईल. म्हणजेच याच पेन्शनसाठी सुमारे 1.60 लाख रुपये अधिक गुंतवावे लागतील.

सरकारी योजनाशी संबंधित इतर गोष्टी

- तुम्ही गुंतवणुकीसाठी मंथली इन्व्हेस्टमेंट, त्रैमासिक गुंतवणूक किंवा सहामाही या तीन प्रकारच्या योजना निवडू शकता.

- आयकर कलम 80CCD अंतर्गत करसवलतीचा लाभ मिळतो.

- एका सदस्याच्या नावे फक्त एक अकाउंट उघडले जाईल.

- 60 वर्षांच्या आधी किंवा नंतर सदस्याचा मृत्यू झाला तर पेन्शनची रक्कम पत्नीकडे जाईल.

- जर सदस्य आणि पत्नी या दोघांचा मृत्यू झाला तर सरकार नॉमिनीला पेन्शन देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT