Insurance policy
Insurance policy esakal
अर्थविश्व

Insurance policy : तूम्ही Life Insurance अजून काढला नाही? जाणून घ्या का आहे गरज

Pooja Karande-Kadam

कोरोना महामारीमुळे लोकांना विम्याचे महत्त्व समजले आहे. अनेक लोक विम्याला फालतू खर्च मानत होते. पण आता तसे राहिलेले नाही. कोरोनाच्या संकटकाळात विमा कंपन्यांच्या व्यवसायात कमालीची तेजी आली आहे. विमा खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विमा कंपन्यांनीही त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.

कोणत्याही संकटाच्या काळात विशेषतः आर्थिक परिस्थितीत, विमा हा एक भक्कम आधार म्हणून आपल्या पाठीशी उभा आहे. जिथे विमा आपल्या कुटुंबाला भविष्यातील कोणत्याही अप्रिय घटनेला तोंड देण्याचे बळ देतो. तिथे बचतीचाही मोठा आधार असतो.

पण, आजही काही लोकांना विमा नकोसो वाटतो. त्याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते, त्यामूळे लोक विम्याच्या जाहीरातींकडे दुर्लक्ष करतात. आणि अडचणीच्यावेळी पश्चाताप करत बसतात.

विमा पॉलिसी कोणत्या आहेत

  • टर्म इन्शुरन्स प्लॅन

टर्म इन्शुरन्स प्लॅन अंतर्गत भविष्यात तुम्हाला काही झाले तर त्यामुळे तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते. व्यक्तीला आर्थिक संरक्षण देण्याचा हा एक सोपा आणि किफायतशीर मार्ग मानला जातो. टर्म इन्शुरन्स ही संपूर्ण संरक्षण योजना आहे आणि ती बाजाराशी जोडलेली नाही. याशिवाय मुदत विम्याचा प्रीमियम इतर कोणत्याही जीवन विम्यापेक्षा कमी असतो.

  • आरोग्य विमा पॉलिसी

महागाईच्या काळात वैद्यकीय खर्च वाढत आहे.  त्यामुळे आरोग्य विमा खूप महत्त्वाचा झाला आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आरोग्य विमा असावा. फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये संपूर्ण कुटुंब देखील समाविष्ट केले जाऊ शकते. चांगल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये डॉक्टरांचे सल्ला शुल्क, वैद्यकीय चाचण्या, हॉस्पिटलायझेशन खर्च आणि ऑपरेशन खर्च इत्यादींचा समावेश असतो.

  • वाहन विमा

वाहन विमा जर तुम्ही कार किंवा दुचाकी चालवत असाल तर वाहनांचा विमा घेणे आवश्यक आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्ससोबत सर्वसमावेशक मोटार विमा कवच घेणे आवश्यक आहे. या विम्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते.

  • अपघात विमा

अपघाती मृत्यूमुळे कुटुंबाचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी अपघात विमा प्रधान मंत्री सुरक्षा विमा मदत करते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. ते बँकेतील बचत खात्याशी जोडलेले आहे. विम्याच्या हप्त्याचे 12 रुपये वार्षिक बँक खात्यात डेबिट केले जातात.

  • घर विमा

गृह विमा आजकाल नैसर्गिक घटनांमध्येही वाढ झाली आहे. चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत. अशा स्थितीत गृहविमाही असायला हवा. होम इन्शुरन्सद्वारे तुम्ही आग लागणे, घरात चोरी होणे. किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे घराचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यावेळी हा विमा कामी येतो.

  • सायबर विमा

सायबर इन्शुरन्स जसजसे आपण डिजिटल होत आहोत, तसतसे सायबर फसवणुकीच्या घटनाही झपाट्याने वाढत आहेत. आपल्या आयुष्याचा लेखाजोखा मोबाईल, लॅपटॉपमधील डेटाच्या रूपाने सायबर विश्वात तरंगत असतो. त्याला कोणीही हॅक करून तूमचे नुकसान होऊ शकते. तुमच्या बँक खात्यांचे रक्षण करण्यासाठी, क्रेडिट कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी, तुम्ही सायबर विमा संरक्षण देखील निवडले पाहिजे.

विमा पॉलिसीची गरज आहे?

- बदलती लाईफस्टाईल

बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत. तसेत, लोकांमध्ये हृदयविकार, किडनी खराब होणे, ट्युमर असे गंभीर आजार होत आहेत. त्यामूळे तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी घेतल्यास बरे होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- टॅक्समध्ये कपात

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या वेबसाइटनुसार, जेव्हा तुम्ही आरोग्य विमा पॉलिसीसाठी प्रीमियम जमा करता. तेव्हा तुम्ही आयकर कलम 80D अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहात. तुम्ही 60 वर्ष वयाच्या पालकांसाठी आरोग्य विमा खरेदी केल्यास, तुम्ही 50,000 रुपयांपर्यंत कपात करू शकता.

- उपचार महागले आहेत

आज वैद्यकीय उपचारांचा खर्च प्रचंड वाढला आहे. वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत ग्राहक त्यांची बचत खर्च करतात. ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील योजनांवर परिणाम होतो. त्यामूळे आरोग्य विमा उतरवणे कधीही चांगले.

- विमा पॉलिसीचे फायदे

  • आपत्कालीन घटना किंवा नैसर्गिक संकट आल्यास सुरक्षितता मिळते.

  • नुकसान भरपाई मिळते.

  • आर्थिक नियोजन बिघडत नाही.

  • पैसे बचत करण्याची सवय लागते.

  • पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक  करता येते. त्यामुळे परताव्याची देखील हमी मिळते.

  • भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन करता येते.

  • नोकरी, व्यवसाय, व्यापार करण्यास प्रोत्साहन मिळते.

  • कठीण/अवघड काम करण्याची हिम्मत विम्यामुळे प्राप्त होते.

  • कुटुंबाची असलेली जबाबदारी पार पाडता येते.

  • सेवानिवृत्ती विमा योजनेतून ठराविक कालावधी नंतर पेन्शन मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT