investment sakal
अर्थविश्व

Investment Tips : इक्विटी, बाँड की म्युच्युअल फंड?; कोणती गुंतवणूक फायदेशीर

वाढत्या महागाईमुळे प्रत्येकाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Investment Tips During Inflation : वाढत्या महागाईमुळे (Inflation) प्रत्येकाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात प्रत्येकाला अशा ठिकाणी गुंतवणूक (Investment) कारायची आहे जिथून कमी कालावधीत अधिक परतावा मिळेल. आज आपण महागाईच्या काळात इक्विटी, बाँड की म्युच्युअल फंड नेमकी कोणती गुंतवणूक चांगली याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

दीर्घ मुदतीसाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही महागाईवर मात करू शकता. याशिवाय म्युच्युअल फंडातदेखील दीर्घकालीन परतावा मिळण्यास मदत होते. तसेच यात रिक्स फॅक्टर कमी असतो.

बाजारातील महागाई ही अनिश्चिततेची बाब आहे. त्यामुळे भविष्यातील संभव्य धोके टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कमोडिटीज आणि एफएमसीजी, पॉवर आणि एनर्जी यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. ज्यावेळी महागाई वाढते त्यावेळी या क्षेत्रात करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळण्याची संधी अधिक असते.

इक्विटी इन्व्हेस्टमेंट बेस्ट

गुंतवणूकदाराने तो करत असलेल्या बचतीचा केवळ दीर्घकालीन भाग इक्विटीसारख्या गोष्टींमध्ये गुंतवणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय काही गुंतवणूक अशा ठिकाणी करावी जी आपत्कालीन स्थितीत सहज काढता येईल. बाजार पेठेत घसरण झाल्यानंतर तुम्ही भांडवल काढून घेतले तर नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. इक्विटी 5 वर्षांच्या कालावधीत चलनवाढीच्या तुलनेत जास्त परतावा देतात असे तज्ज्ञांचे मत आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवा पैसे

इक्विटी इन्व्हेस्टमेंटशिवाय म्युच्युअल फंड (Mutual Fund) हादेखील गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना अनेक शेअर्सच्या सेवा अत्यंत कमी किमतीत मिळतात.

बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडात (BAF) गुंतवणूक

अॅडव्हांटेज फंड (BAF) हादेखील गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे, परंतु गुंतवणुकीसाठी तुम्ही कोणत्या फंडाची निवड करता त्यावर नफा अवलंबून असतो. कारण असे अनेकदा घडले आहे. ज्यामध्ये BAF आपत्कालीन स्थितीतील जोखीमांपासून संरक्षण प्रदान करण्यात अयशस्वी ठरले आहेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

Solapur Fraud: 'सोलापुरातील महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक'; संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

SCROLL FOR NEXT