World Braille Day
World Braille Day 
Blog | ब्लॉग

BLOG: लुईस ब्रेलनं असं काय केलं? ज्यामुळं अंध व्यक्तींना मिळाली नवी दृष्टी!

सकाळ ऑनलाईन

-- गौरव मालक

World Braille Day : आपल्या आजूबाजूला अनेक अंध व्यक्तींना आपण स्पर्शाच्या साह्यानं लिहिताना वाचताना अनेकदा पाहिलं असेल. मात्र, कुठल्याही भाषेतील हे शिक्षण घेत असताना ते लिपी कोणती वापरतात? या लिपीचा शोध कोणी व कसा लावला? पुढे ही लिपी जगभरात कशी पसरली? हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या 'जागतिक ब्रेल डे' निमित्त हे जाणून घेऊयात..! (World Braille Day What did Louis Braille due to blind people got a new vision)

१८ व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ होता. फ्रान्समधील कोपरे या गावी मोनिक ब्रेल आणि सायमन ब्रेल या दांपत्याच्या पोटी ४ जानेवारी १८०९ रोजी एका मुलानं जन्म घेतला. याच मुलाचे नाव लुईस. इतर मुलांप्रमाणेच लहानपणी लुईस अत्यंत खोडकर होता, त्याच्या वडिलांचा चर्मोद्योगाचा व्यवसाय होता.

लुईस तीन-चार वर्षांचा असेल, एक दिवस त्यानं त्याच्या बाबांकडे दुकानात येण्याचा हट्ट केला. यावेळी दुकानात वडिलांचं अनुकरण करत असताना त्याच्या हातातील अवजारामुळं त्याच्या एका डोळ्याला दुखापत झाली. यात त्याचा डोळा जागीच निकामी झाला. कालांतराने त्या डोळ्याचा प्रभाव दुसऱ्या डोळ्यावर झाला आणि तो पूर्णतः अंध झाला.

पुढे घरच्यांसमोर लुईसच्या भविष्याचा आणि त्याच्या शिक्षणाचा प्रश्न होता. मात्र, त्या काळात अंध व्यक्तींच्या शिक्षणासाठी कुठल्याही पद्धतीचं साधन उपलब्ध नव्हतं. दुसरीकडे मला शिकायचं आहे हा लुईचा हट्ट वाढत होता. नंतर लुईसला एका शाळेत घातलं गेलं. शिक्षकांनी इतर मुलांना शिकवायचं आणि लुईने केवळ ते ऐकायचं, हा लुईचा प्रवास सुरू झाला.

लुईस १५ वर्षाचा असताना, लुईच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. फ्रान्सच्या सैन्य दलाचे तत्कालीन प्रमुख चार्ल डार्वियर यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लुईस ब्रेल याच्या शाळेला भेट दिली. यावेळी त्यांचे लक्ष अंध असलेल्या या मुलाकडे गेलं आणि त्यांनी शाळेतील शिक्षकांना विचारलं, हा कशा पद्धतीने शिक्षण घेतो? या प्रश्नाचे उत्तर शिक्षकांकडे नव्हतं.

त्याच काळात फ्रान्स सैन्यात संवादासाठी १२ टिंबांची लिपी वापरली जात होती.त्या लिपीच्या आधारावर स्पर्शाच्या साह्याने हा मुलगा शिकू शकतो, असं म्हणत त्यांनी शिक्षकांना त्या लिपीची संपूर्ण कल्पना दिली आणि ती लिपी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

मात्र, १२ टिंबांची लिपी असल्याने ती स्पर्शाच्या साह्याने अभ्यासनं जरा कठीण होतं. पण १८२४ ते १८२९ या कालखंडात लुईस ब्रेल यानं त्या लिपीवर संशोधन केलं आणि 12 टिंबांची ती लिपी सहा टिंबांमध्ये रूपांतरित केली. आपल्या इतर अंध मित्रांच्या मदतीने, त्या लिपीचे अनेक प्रयोग झाले व त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. हे यश मिळाल्यानंतर 'फ्रान्सचा समग्रकालीन इतिहास' आणि ' बायबल ' हे दोन पुस्तक लुईस ब्रेल यांनी या लिपीत लिहिले. त्यानंतर ०६ जानेवारी १८५२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या तब्बल १०० वर्षांनी १९५३ मध्ये या लिपीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.

दरम्यान, पुढे या लिपीला जगभरात 'ब्रेल लिपी' म्हणून ओळखलं जाऊ लागले. याच लिपीमुळं दृष्टीबाधितांना जीवनाकडं सकारात्मकतेने बघण्याची नवी दृष्टी मिळाली. अशा प्रकारे अंधव्यक्ती आपल्या कर्तुत्वाचा सातत्यानं दाखला देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT