Astrology esakal
संस्कृती

Astrology : मानसिक ताण तर काहींना धनयोग देणारा आठवडा, जाणून घ्या तुमच्या राशीविषयी

कधी कधी एकाच राशीत दोन ग्रह एकत्र आल्याने विचित्र योग तयार होतात. काही योग शुभ तर काही योग अशुभ असतात.

सकाळ डिजिटल टीम

Chandra Gochar Yog : वैदिक ज्योतिषात चंद्राला मनाचा कारक मानला जातो. चंद्राच्या प्रभावामुळे व्यक्तीचे मन अशांत किंवा स्थिर होते. मनुष्याचे मनावर नियंत्रण असेल तर सगळं सहज शक्य होतं, पण मन अस्थिर असेल तर काम व्यवस्थित होत नाही. एकूणच कामात अनेक अडचणी येतात. चंद्राच्या राशी बदलाचा बारा राशींवर परिणाम होतो.

ज्योतिषशास्त्रात चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह आहे. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करत असतो. त्यामुळे या ग्रहाचा प्रत्येक राशीवर त्या त्या गोचरानुसार परिणाम होत असतो. हा परिणाम अल्प कालावधीसाठी असला तरी महत्त्वाच्या कामात ऐन मोक्याच्या वेळी अडचणीचा ठरू शकतो. कधी कधी एकाच राशीत दोन ग्रह एकत्र आल्याने विचित्र योग तयार होतात. काही योग शुभ तर काही योग अशुभ असतात. त्याप्रमाणे गोचराचे परिणाम होत असतात.

'या' राशींसाठी ठरेल धन योग

११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी २ वाजून २३ मिनिटांनी चंद्र हा ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मीन राशीत गजकेसरी योग तयार होणार आहे. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे या राशीत गजकेसरी योग तयार होत आहे. गजकेसरी योग हा अतिशय शुभ योग मानला जातो आणि कुंडलीत तयार झालेल्या सर्व धन योगांपैकी हा सर्वात शक्तिशाली योग आहे.

हा योग कुंभ राशीच्या दुसऱ्या, मिथुन राशीच्या दहाव्या आणि वृषभ राशीच्या अकराव्या स्थानात तयार होत आहे. त्यामुळे या तीन राशींना चांगला फायदा होईल.

'या' राशींना जाणवेल मानसिक ताण

चंद्र १३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मेष राशीत ग्रहण योग तयार होणार आहे. जेव्हा चंद्र राहूच्या संयोगात येतो, तेव्हा ग्रहण योग तयार होतो, हा अत्यंत अशुभ मानला जातो. ज्या लोकांवर त्याचे वर्चस्व असते त्यांच्या मानसिक स्थितीवर त्याचा वाईट परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि चंद्राच्या संबंधामुळे चंद्र दूषित होतो. यामुळे मीन, कर्क आणि मिथुन राशीवर परिणाम होईल.

'या' राशींसाठी फायद्याचा काळ

१५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान चंद्र मंगळ ग्रहाची वृषभ राशीत युती होत असल्याने लक्ष्मी योग तयार होत आहे. गोचर कुंडलीतील चंद्र आणि मंगळ यांच्या युतीमुळे लक्ष्मी योग तयार होतो. या योगाला धन योग म्हणून संबोधलं जातं. मेष, सिंह आणि कर्क राशीला फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! खात्यात थेट ६००० जमा होणार? रखडलेल्या ४ हप्त्यांची रक्कम एकत्रच मिळणार

T20 WC, IND vs NAM: भारताच्या Playing XI मध्ये होणार दोन मोठे बदल, अभिषेक शर्मासह 'हा' खेळाडूला बेंचवर बसणार?

Khanapur Accident : लग्नाचे कार्य आटोपून गोव्याला परतताना काळाचा घाला; पत्नी जागीच ठार, पती जखमी, पालीतील 'ते' वळण ठरतंय जीवघेणं

भरधाव कार ट्रेलरला धडकून ६ मित्रांचा मृत्यू; वय २३ ते २६ वर्षे, सर्वजण एकाच गावातले

Indapur News : इंदापूर औद्योगिक विकासाला मिळणार गती! ‘एमआयडीसी’साठी एक हजार एकर जमीन

SCROLL FOR NEXT