Uddhav Thackeray and Aditya Thackeray  sakal
संस्कृती

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का दिला? ज्योतिषतज्ज्ञ काय म्हणतात

हे सर्व राजकीय नाट्य का घडले हे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहूया.

प्राचार्य रमणलाल शहा

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड अस्थिरता दिसून येत होती. या संदर्भात सर्वसामान्यांमधून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. अनेकांकडून वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. नक्की काय होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता ताणली गेली होती. त्यातच विविध पक्षांकडून सुप्रिम कोर्टामध्ये विविध याचिका दाखल केल्या जात होत्या. एकनाथ शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी सुरतमध्ये व नंतर गुवाहाटीमध्ये हॉटेलमध्ये थांबले होते. त्यानंतर तेथून ते गोव्याला गेले. त्यामुळे लोकांची उत्कंठा ताणली जात होती.

या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे महाविकास आघाडी बरखास्त झाली. हे सर्व नाट्य का घडले हे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहूया.

उद्धव ठाकरे (२७-०७-१९६०) मुंबई ( राशी कुंडली)

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच उद्धव ठाकरे यांचे ग्रहमान प्रतिकूलच आहे. सुरुवातीचे वर्ष-दीडवर्ष कोरोनातच गेले. त्याच्यानंतर काही दिवस आजारपण आले. या सर्वांमध्ये कार्यकर्ते, नेते, प्रशासन यांच्याबरोबर संबंध कमी आला. राजकारणाच्या दृष्टीने व अधिकार योगाच्या दृष्टीने दहावे स्थान महत्त्वाचे असते. त्यांचा स्वामी शुक्र हा बाराव्या स्थानात आहे व प्रथम स्थानाचा स्वामी व राजकारणाच्या संदर्भातील महत्त्वाचा ग्रह रवी हाही बाराव्या स्थानात आहे. त्याच्यावर गेली कित्येक महिने शनीची दृष्टी होती. दि. २९ एप्रिल २०२२ रोजी शनी कुंभ राशीत आला. या शनीची प्रथमस्थानातील चंद्रावर व सुख स्थानावर दृष्टी आली. गुरू आठव्या स्थानात आहे. त्याच्यामुळे शनी व गुरू हे दोन्ही ग्रह प्रतिकूल ठरले. त्याचा परिणाम या सर्व परिस्थितीवर झाला.

आदित्य ठाकरे : (१३-०६-१९९०) दुपारी ४ वा. मुंबई

आदित्य ठाकरे यांच्या मूळ पत्रिकेतच सुखस्थानात शनी, चंद्र व राहू आहेत. सातव्या स्थानाचा स्वामी मंगळ हा सहाव्या स्थानात व त्याच्यावर शनीची दृष्टी मुळातच आहे. यांना दि. २७/१०/२०१७ पासूनच साडेसाती सुरू आहे व गेली दीड वर्ष हा शनी प्रत्यक्ष राशीवरच आहे. या शनीची अधिकाराच्या दहाव्या स्थानावर दृष्टी आहे व लग्न कुंडलीत गुरू सहाव्या स्थानात आहे. विशेषत: शनीच्या साडेसातीमुळे या पत्रिकेला फार मोठ्या प्रमाणावर प्रतिकूलता निर्माण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाच्या आतूनच काही सूत्रं आम्हाला माहिती पुरवू लागले

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT