Gokulashtami esakal
संस्कृती

Gokulashtami : १८ की १९ कोणत्या दिवशी करायची गोकुळाष्टमी?

यावर्षी गोकुळाष्टमी कोणत्या तारखेला करायची याविषयी संभ्रम आहे. जाणून घेऊया नक्की कोणत्या तारखेला गोकुळाष्टमी करायची, तिथी आणि रोहिणी नक्षत्र कधी आहे?

सकाळ डिजिटल टीम

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या अष्टमीला कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. धार्मिक मान्यतांनुसार गोकुळाष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री १२ वाजता मथुरेला कृष्णाचा जन्म झाला होता. या दिवशी लोक बाळगोपाळाच्या आगमनासाठी वेगवेगळे पदार्थ बनवतात. मंदिर आणि घराची सजावट करतात. पंचांगाच्या फरकामुळे गोकुळाष्टमी यंदा १८ व १९ अशा दोन दिवस साजरी होणार आहे.

गोकुळाष्टमीची तिथी व रोहिणी रक्षत्र कधी?

यंदा कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी दोन दिवस येत आहे. १८ ऑगस्ट २०२२ गुरवारी रात्री ९ वाजून २१ मिनीटापासून सुरू होत असून १९ ऑगस्ट २०२२ शुक्रवार रात्री १० वाजून ५० मिनीटांनी समाप्त होणार आहे. कृष्णाचा जन्म रात्री १२ वाजेचा असल्याने १८ ऑगस्टचा दिवस योग्य असणार आहे. तर सुर्योदयाच्या दृष्टीने विचार केला तर १९ ऑगस्टला पुर्ण दिवस गोकुळाष्टमी साजरी होऊ शकते. श्री कृष्ण जन्मस्थान मथुरेला १९ ऑगस़्टला जन्मोत्सव साजरा होईल.

रोहिणी नक्षत्र कधी आहे?

कृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला होता. पण यंदा १८ व १९ दोन्ही दिवशीपण नक्षत्र नाही. १९ ऑगस्टला कृतिका नक्षत्र मध्यरात्री १ वाजून ५३ वाजेपर्यंत असेल त्यानंतर रोहिणी नक्षत्र सुरू होणार आहे.

गोकुळाष्टमी २०२२ राजयोग/शुभयोग

यंदा गोकुळाष्टमी अत्यंत शुभयोगावर आली आहे. कृष्ण जन्मोत्सवाला वृध्दी व धृव हे दोन शुभयोग आले आहेत. असे मानले जाते की, वृध्दी योगात बाळगोपाळासह लक्ष्मी स्वरूपा राधेचे पूजन केले की, घरात समृध्दी येते.

वृध्दी योग प्रारंभ - १७ ऑगस्ट २०२२ रात्री ८ वाजून ५६ मिनीटे

वृध्दी योग समाप्ती - १८ ऑगस्ट २०२२ रात्री ८ वाजून ४१ मिनीटे

धृव योग प्रारंभ - १८ ऑगस्ट २०२२ रात्री ८ वाजून ४१ मिनीटे

धृव योग समाप्ती - १९ ऑगस्ट २०२२ रात्री ८ वाजून ५९ मिनीटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

MD Drugs Crackdown: न्हावरेत एमडी ड्रग्सविरोधात संयुक्त धडक कारवाई; ११.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत तर एक फरार

Crime News: माळेगाव पोलिसांची अवैध दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; दोन जण अटक, ४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

SCROLL FOR NEXT