Ayman al-Zawahiri and Himanta Biswa Sarma  सकाळ डिजिटल टीम
देश

"अल कायदाला गणवेशाचे महत्त्व समजणार नाही पण भारतीय मुस्लिमांना.."

जवाहिरीच्या व्हिडीओमुळे कर्नाटकातील हिजाब वाद पुन्हा चिघळलेला दिसून येत आहे

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकसह भारताच्या विविध भागांमध्ये हिजाब मुद्दा बराच गाजला. यात आता जागतिक दहशतवादी संघटनेने उडी घेतली असून या प्रकरणावर अल कायदाने (Al-Qaeda) भाष्य केले. अल कायदाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये संघटनेचा प्रमुख अयमान-अल-जवाहिरीने (Ayman al-Zawahiri) कर्नाटकातील हिजाबच्या वादामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मुस्कान खानचे कौतुक केले आहे. इतकेच नाही तर व्हिडिओमध्ये जवाहिरीने मुस्कानला 'इंडियाज नोबल लेडी' असे संबोधले आहे.

या व्हिडीओमुळे कर्नाटकातील हिजाब वाद पुन्हा चिघळलेला दिसून येत आहे. यात आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले. अल कायदाला हे समजणार नाही. कर्नाटक उच्च न्यायालयाने कायम ठेवलेल्या सरकारच्या हिजाब बंदीचे समर्थन करत आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, जर धार्मिक कपड्यांवर बंदी घातली नाही तर शैक्षणिक संस्था धार्मिकतेचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ बनतील. (Al Qaeda will not understand the significance of uniform Assam chief minister Himanta Biswa Sarma said)

शर्मा म्हणाले, “तुम्ही हिजाब घातला तर मी कोणीतरी काहीतरी वेगळं घालणार, मग शाळा आणि कॉलेज हे धार्मिक कपडे आणि धार्मिकता दाखवण्यासाठी एक व्यासपीठ बनणार. मग शाळा आणि कॉलेज कसे चालू ठेवता येईल? गणवेशामुळे कोणताही जात,धर्माचा भेद नसतो. गरीब आणि श्रीमंत असा भेद नसतो.”

पुढे ते म्हणाले, "अल कायदाला या गोष्टी कधीच समजणार नाही पण मला खात्री आहे की भारतीय मुस्लिमांना हे समजेल की आपल्याला गणवेश घालायला हवा. एकदा का तुमचे शाळा-कॉलेज संपले की, तुम्ही तुमच्या घरी परत या आणि तुम्हाला जे घालायचे आहे ते तुम्ही घाला. मला खात्री आहे की भारतीय मुस्लिम न्यायव्यवस्थेच्या पाठीशी आहेत"

अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी यांनी 8.43 मिनिटांची क्लिप जारी केली. ज्यामध्ये त्यांनी मुस्कान खानचे कौतुक केले. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.

या व्हिडीओत हिंदू भारत आणि तेथील लोकशाहीचे वास्तव समोर आल्याचे जवाहिरीने म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये तो मुस्कानला त्याची बहीण म्हणत आहे. त्याच बरोबर त्याने भारतीय मुस्लिमांना ‘या छळावर’ प्रतिक्रिया देण्यास प्रोत्साहित केले आहे. जवाहिरीने हिजाब वादावर भारतातील मुस्लिमांना उत्तर देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे काश्मीर आणि इतर भागांना इस्लामिक झोन बनवण्याबाबत अल कायदा नेहमीच भाष्य करत आला आहे. अल कायदा काश्मीर आपले पुढचे लक्ष्य असल्याचे म्हणत आहे. आता हिजाब प्रकरणी व्हिडीओ जारी करत भारतीय मुस्लिमांना चिथावण्याचे काम अल कायदा करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT