Senior Assam Congress leader Bhupen Borah

 

esakal

देश

Assam Congress Political Drama : निवडणुकीच्या आधी आसाम काँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोडी!, दिग्गज नेत्याने काही तासांत राजीनामा घेतला मागे...

Bhupen Borah’s Resignation and Sudden Withdrawal: काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपकडून होती खुली ऑफर ; जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण?

Mayur Ratnaparkhe

Senior leader Bhupen Borah withdraws resignation : आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी आज(सोमवार) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपला राजीनामा सोपवला होता. खरंतर आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा धक्काच होता. परंतु बोरा यांनी अवघ्या काही तासांत आपला राजीनामा परत घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

खरंतर बोरा यांनी आपल्या राजीनाम्यात दावा केला होता की, पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर याआधी आपण सकाळी आठ वाजता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे राजीनामा पाठवला होता, अशी माहितीही बोरा यांनी दिली होती.

बोरा यांनी म्हटले होते की, "मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. मी आधीच केंद्रीय नेतृत्वाकडे राजीनामा पाठवला आहे. माझ्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे." एवढच नाहीतर, काँग्रेस पक्षाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना बोरा म्हणाले होते की, पक्षाचे उच्च कमांड संघटनात्मक बाबींवर वेळेवर आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात अपयशी ठरले आहे.

खरंतर या वर्षी आसाममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, भूपेन बोरा यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे राजीनाम्यानंतर, काँग्रेस नेते गौरव गोगोई, भंवर जितेंद्र सिंह आणि प्रद्युत बोरदोलोई यांनी रायजोर दलाचे प्रमुख अखिल गोगोई यांच्यासह भूपेन बोरा यांच्या गुवाहाटी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.

अचानक निर्णय का बदलला? -

आसाम काँग्रेसचे प्रभारी भंवर जितेंद्र सिंह म्हणाले, "भूपेन बोरा यांनी राजीनामा मागे घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ज्येष्ठ काँग्रेस नेते भूपेन बोरा हे काँग्रेस कुटुंबातील एक महत्त्वाचे सदस्य आहेत. त्यांनी आपला राजीनामा आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवला होता. कधीकधी काँग्रेस कुटुंबात मतभेद निर्माण होतात. काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. राहुल गांधींसह पक्ष नेतृत्वाने त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली. आम्ही संवादातून हा प्रश्न सोडवला. ते गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते."

भाजपकडून होती ऑफर -

प्राप्त माहितीनुसार काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर लगेचच, भूपेन बोरा यांना भाजपने जागा देऊ केली होती. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले होते की, भारतीय जनता पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत. जर बोरा भाजपमध्ये सामील झाले तर ते सुरक्षित जागेवरून त्यांची निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT