case against railway for refund
case against railway for refund sakal
देश

वाह रे पट्ठ्या! 35 रुपयांसाठी रेल्वेविरुद्ध 5 वर्ष लढला; 33 रुपये दिले म्हणून पुन्हा कोर्टात

सकाळ डिजिटल टीम

जेव्हा आपण रेल्वे तिकीट बुक (Railway Ticket Booking) करतो, तेव्हा पेमेंट गेटवे चार्ज (Payment Gateway Charge) ते सर्व्हिस चार्ज (Service Charge) द्यावा लागतो. कोटा येथील अभियंता सुजित स्वामी यांनीही पाच वर्षांपूर्वी रेल्वे तिकीट बुक केले होते. मात्र, नंतर त्यांनी तिकीट रद्द केले. रेल्वेने तिकीट बुक करताना सर्व्हिस चार्जच्या नावाखाली 35 रुपये घेतले होते, मात्र रद्द केल्यावर त्याचा परतावा त्यांना मिळाला नाही. परंतु स्वामी परतावा मिळविण्यावर ठाम होते. 5 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी केस जिंकली. विशेष म्हणजे स्वामींच्या या 5 वर्षांच्या केस लढण्याचा फायदा सुमारे 3 लाख लोकांना फायदा झाला.

अनेक यूजर्सना मिळेल परतावा-

परतावा मिळवण्यासाठी स्वामींनी माहितीच्या अधिकाराचा (आरटीआय) आधार घेतला. सेवा शुल्काचे ३५ रुपये मिळविण्यासाठी सरकारी विभागांना अनेक पत्रे लिहावी लागल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सुमारे 50 आरटीआय अर्ज दाखल केले. अखेरीस, रेल्वेने सर्व्हिस चार्जच्या नावाखाली जमा केलेले २.४३ कोटी रुपये परत करण्यास मान्यता दिली. 2.98 लाख IRCTC वापरकर्त्यांकडून हे कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले होते. यातील अनेक वापरकर्त्यांनी एकापेक्षा जास्त वेळा तिकिटे बुक केली होती आणि ती रद्द केली होती. (Fought 5 years against Railways for 35 rupees; 33 again in court)

स्वामी यांना रिफंड मंजूर झाल्याची बातमीही आरटीआयच्या उत्तरातून समोर आली आहे. त्यांनी दावा केला की त्यांच्या एका आरटीआयला उत्तर म्हणून आयआरसीटीसीने रिफंडची माहिती दिली आहे. IRCTC ने सांगितले की 2.98 लाख लोकांना प्रत्येक तिकिटावर 35 रुपयांचा रिफंड मिळेल. या लाखो लोकांना IRCTC कडून एकूण 2.43 कोटी रुपयांचा परतावा मिळेल. स्वामी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 2.98 लाख लोकांना सेवा शुल्काचे 35 रुपये परत करण्यात माझे सतत ट्विट करणे हे महत्त्वाचे योगदान आहे. मी पंतप्रधान, रेल्वे मंत्री, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, जीएसटी परिषद आणि अर्थमंत्र्यांना टॅग करत सतत ट्विट करत होतो.

जीएसटी लागू होण्यापूर्वीचे प्रकरण-

स्वामींच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 02 जुलैच्या प्रवासासाठी एप्रिल 2017 मध्ये गोल्डन टेंपल मेलमध्ये कोटा ते दिल्लीचे तिकीट बुक केले होते. याच्या एक दिवस आधी म्हणजेच १ जुलैपासून जीएसटी लागू झाला. त्यांनी 765 रुपयांना तिकीट काढले होते. त्यांनी तिकीट रद्द केल्यावर रेल्वेने 65 ऐवजी 100 रुपये कापून 665 रुपये परत केले. जीएसटी लागू होण्यापूर्वीच त्यांनी तिकीट रद्द केले होते, तरीही 35 रुपये सेवा शुल्क वजा केले होते

3 वर्षांनी परत मिळाले 2 रुपये -

RTI द्वारे प्रदीर्घ लढा दिल्यानंतर स्वामींना 01 मे 2019 रोजी 33 रुपयांचा परतावा मिळाला. त्यानंतर 35 रुपयांच्या सेवा कराच्या राउंड ऑफ व्हॅल्यूच्या नावावर 2 रुपये कापले गेले. स्वामींनी आता हे 02 रुपये परत मिळवण्यासाठी लढा सुरू केला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी, त्यांना यातही यश मिळाले, जेव्हा आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 2.98 लाख युजर्सना पूर्ण 35 रुपयांच्या परताव्याची माहिती दिली. स्वामी म्हणाले की, त्यांना आयआरसीटीसीकडून दोन रुपये परतावा देण्याबाबत एक मेल देखील आला आहे. त्यानंतर बँकेचे तपशील पाठवून सोमवारी 02 रुपयेही परत मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT