wine
wine esakal
देश

52 रुपयांना बीअर अन् 350 रुपयाला रम; गुजरातमध्ये दारुचे भाव एवढे कमी?

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : देशभरात सध्या महागाईने कंबरडे मोडले असून सध्याचे गुजरातमधील दारुचे भाव काय आहेत माहितीये? बियरची कॅन ५२ रुपयांना आणि रमची एक बाटली ३५० रुपयांना. हे भाव ऐकूण आपणही आश्चर्यचकित झाला असाल. पण चिअर्स करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की हे बाजारभाव नसून राज्याच्या पोलिस विभागात नोंद केलेले मागच्या वीस वर्षापूर्वीचे दारूचे भाव आहेत. त्यानंतर या भावात कोणतेच बदल केलेले नाहीत.

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या गांधीनगरमधील पोलिसांच्या एका रेडमध्ये पकडण्यात आलेल्या एका ब्रॅण्डच्या व्हिस्कीच्या तीन बाटल्यांची किंमत फक्त ११२५ रुपये होती तर ७५० मिलीच्या एका बाटलीची किंमत ही ३७५ रुपये होती.

पण सध्या या बाटल्यांची किंमत ५४० ते ६०० च्या दरम्यान आहे. याचे कारण म्हणजे गुजरातच्या पोलिस विभागाने जप्त केलेल्या दारुच्या किंमतीचे मूल्यमापण करण्यासाठी 28 डिसेंबर 2002 रोजी नोंदणी करताना चूक केली होती आणि आजही तेच दर मूल्यमापनासाठी वापरले जातात. म्हणून २००२ साली असलेले दर आजही पोलिस पकडण्यात आलेल्या दारुच्या किंमती मोजण्यासाठी वापरतात.

2002 मध्ये केलेल्या नोंदीनुसार किंमत

अधिसूचनेनुसार, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आणि आयात केलेल्या दारूच्या विविध ब्रँडची किंमत 52 ते 850 रुपयांच्या दरम्यान आहे. या ब्रँड्सनी गेल्या काही वर्षांत दरात मोठी वाढ केली आहे. त्यांची किंमत आता 190 ते 1,900 रुपयांपर्यंत आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, देशी दारूची किंमतही गेल्या 20 वर्षांपासून 20 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. मात्र, सध्या राज्याच्या विविध भागात ५० ते ८० रुपये प्रतिलिटर दर आहे. दरम्यान दारूबंदी विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, आयात केलेली दारू आणि देशी दारूचे दर दर 3-4 वर्षांनी वाढत होते. यादरम्यान जप्त केलेल्या साठ्याचे मूल्यमापन करण्यासाठी जुने दर वापरण्यात आले आहेत. 1999 नंतर 2002 मध्ये दारूच्या दराबाबत आदेश काढण्यात आला होता त्यानंतर कोणतीही सुधारणा झालेली नाही. म्हणून 20 वर्षांपूर्वी निश्चित केलेल्या किंमतींच्या आधारे पोलिस जप्त केलेल्या साठ्याचे मूल्यमापन करत असतात असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

किंमतीत बदल नाही

जप्त केलेल्या दारूचे मूल्य बाजार मूल्याच्या बरोबरीने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये दिसून येते याची खात्री करण्यासाठी सुधारित दारूचे दर आवश्यक आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 2002 आणि 2022 मधील दारूच्या किंमतीत मोठी तफावत असून हे कायदेशीर प्रक्रियेदरम्यान अडचणी निर्माण करू शकते. अलिकडच्या वर्षांत दारूच्या किमती सुधारल्या गेल्या नसून नुकताच दर सुधारण्याचा प्रस्ताव आला आहे पण असा प्रस्ताव कधीही येऊ शकतो असं गुजरातचे डीजीपी आशिष भाटिया यांनी बोलताना सांगितलं.

गुजरात सरकारने 2017 मध्ये अधिक कठोर कायदे दारुसंबंधात लागू केले होते ते 2018 मध्ये लागू केले गेले. मात्र, त्यांनी दारूच्या बाजारभावात बदल केला नाही. नवीन कायद्यानुसार, दारूचे उत्पादन, खरेदी, विक्री किंवा वाहतूक करताना दोषी आढळणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. पूर्वीच्या कायद्यात या बेकायदेशीर कृत्यासाठी केवळ 3 वर्षांची शिक्षा होती. त्याचप्रमाणे दारू दुकान चालवणाऱ्यांना तसेच त्यांना मदत करणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT