Breakfast
Breakfast 
देश

Breakfast News: पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात ते दिल्लीत भाजप नेत्याची आत्महत्या; वाचा एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये खूप वेगाने वाढ होत चालल्याचे गेल्या काही दिवसांतील आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे मुंबई, पुणे तसेच राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्णांना बेड्स मिळणे अवघड होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री संचारबंदी लागू करण्यात आली. तर दिल्लीमध्ये एका भाजप नेत्यानं आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर   

१) राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय; 25 दिवसांत चौपट रुग्ण
राज्यातील कोविडमध्ये गेल्या २५ दिवसांत २०.३२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. ४ ते २८ फेब्रुवारीला नोंदवण्यात आलेल्या रुग्णांच्या तुलनेत मार्चच्या आकडेवारीत सहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. वाचा सविस्तर

२) Petrol Diesel Price - पेट्रोल डिझेलच्या दरात किरकोळ कपात 
गेल्या महिन्यात शंभरी गाठलेल्या पेट्रोलचे दर आता कमी होत आहेत. आता चार दिवसांनी पुन्हा एकदा इंधन तेलाचे दर घसरले आहेत. वाचा सविस्तर

३) मुंबईत कोरोना रुग्ण वेटिंग लिस्टमध्ये, खासगी रुग्णालयातील बेड्स फुल्ल
कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबईतील खासगी रुग्णालयातील बेड्स फुल्ल झाले आहेत. मुंबईतील बॉम्बे, सैफी, लीलावती, नानावटी, हिरानंदानी आणि इतर सर्व मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड बेड्सची कमतरता भासू लागली आहे. वाचा सविस्तर

४) पुण्यातील ‘जम्बो’मध्ये रुग्णांची संख्या वाढली
जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये जेमतेम आठवडाभरात तीनशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. वाचा सविस्तर

५) पुणेकरांनो, आता बेशिस्तपणा नको! विनाकारण रात्री हिंडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शहरात दररोज रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत संचार मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

६) हवाई हल्ल्यानंतर म्यानमारच्या लोकांची थायलंडमध्ये धाव
म्यानमारच्या लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्या आणि अधिक स्वायत्तता मागणाऱ्या कारेन गावातील बंडखोरांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर या गावातील नागरिक मोठ्या संख्येने शेजारील थायलंडमध्ये पळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर

७) केरळच्या रणांगणावर तारकांचा झगमगाट; सुरेश गोपी, गणेशकुमार, मुकेश मैदानात 
केरळमध्ये सध्या प्रचाराचा राजकीय ज्वर शिगेला पोचला आहे, यंदा विविध राजकीय पक्षांनी सिनेतारकांना मैदानामध्ये उतरविले असून यामध्ये मोठ्या पडद्यावरील कलाकारांप्रमाणेच छोट्या पडद्यावरील कलाकारांचा देखील समावेश आहे. वाचा सविस्तर

८) बॉबी, ऐश्वर्याला कित्येक वर्षांपूर्वीच होती कोरोनाची माहिती; भन्नाट मीम्स व्हायरल
प्रसिध्द अभिनेता बॉबी देओल आणि ऐश्वर्या रॉय यांना आपल्याला कोरोना होणार याची काही वर्षांपूर्वीच कल्पना होती. असा आशयाचा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाचा सविस्तर

९) दिल्लीत भाजप नेत्याच्या आत्महत्येनं खळबळ; पार्कमध्ये घेतला गळफास
पश्चिम दिल्लीतील भाजप नेत्यानं घराजवळच्या पार्कमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर

१०) राज्यात उन्हाचा चटका वाढला; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, पुण्यातही कमाल तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत उसळी मारेल, असा इशारा हवामान खात्याने सोमवारी दिला. वाचा सविस्तर

११) मोठी बातमी: MIDCचा सर्व्हर हॅक, हॅकर्सकडून 500 कोटींची मागणी
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सर्व्हर हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT