latest news top ten news today
latest news top ten news today 
देश

भारतरत्नांच्या चौकशीवरून फडणवीस भडकले ते अमांडा, मिया यांचे ट्रोलर्सना उत्तर; वाचा एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - देशातील शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु झालेल्या चर्चेने आता राजकारण तापलं आहे. महाराष्ट्रातील दिग्गजांनी केलेल्या ट्विटची आता चौकशी करणार असल्याचं राज्य सरकारने म्हटलं असून त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भडकले आहेत. तर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी अमांडा आणि मिया खलिफा यांच्यावर पैसे घेऊन ट्विट केल्याचा आरोप केला जात आहे. त्याला दोघींनीही उत्तर दिलं आहे. दरम्यान, शेअर बाजारात पुन्हा उच्चांकी उसळी बघायला मिळाली. तर सोने चांदीचे दरही किरकोळ वाढले.

सेलिब्रिटींवर ट्विट करण्यासाठी मोदी सरकारने दबाव टाकला होता का याची चौकशी करण्यात येईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केलं आहे. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले आहेत. वाचा सविस्तर

आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाची दखल घेतल्यानंतर देशातील दिग्गज व्यक्तींनी एकापाठोपाठ ट्विट केले होते. आता महाराष्ट्र सरकार या ट्विट्सची चौकशी करणार आहे. वाचा सविस्तर

''अमित शहा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या पायगुणाने महाविकास आघाडीचे सरकार जाईल'' असं नारायण राणे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला विनोदाची उपमा देत शरद पवार यांनी टोला लगावला आहे. वाचा सविस्तर

1 एप्रिल 2021 पासून आपल्या ग्रॅज्यूएटी, पीएफ आणि कामाच्या तासांमध्ये मोठा बदल पहायला मिळू शकतो. कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्यूएटी आणि पीएफमध्ये वाढ होईल. तर, हातात येणारा पैसा म्हणजे टेक होम सॅलरी कमी होईल. वाचा सविस्तर

Love Matters : आपण बरेचदा म्हणतो की प्रेम हा 'केमिकल लोच्या' आहे. तर हो! प्रेमात केमिकल लोच्या होतोच. आणि आपण आज याच प्रेमामागची सायकॉलॉजी, केमिकल लोच्याविषयी सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. वाचा सविस्तर

दिवसेंदिवस नव नवीन उच्चांक गाठणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने आज, आणखी एक विक्रम केला. गेल्या आठवड्यात 51 हजारांचा टप्पा पार करून खाली आलेल्या मुंबई शेअर निर्देशांक आज पुन्हा उच्चांक गाठला आहे. वाचा सविस्तर

गेल्या सहा महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 9 हजार 300 रुपयांची घसरण.. आज सोने चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली. वाचा सविस्तर

व्हॉटसअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीची चर्चा गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणावर झाली. या प्रायव्हसी पॉलिसीचा फटका कंपनीला बसला आहे. प्रायव्हसी पॉलिसीने WhatsApp ची गेम; Telegram ला झाला फायदा... वाचा सविस्तर

मदर इंडियातील गाण्यावर उसाच्या फडात डान्सचा व्हिडिओ; माधुरी दीक्षितने शेअर करून कौतुक केलं आहे. पाहा व्हिडिओ

शेतकरी आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट करणा-या मिया खलिफा आणि अमांडा सर्नी यांना ट्रोलर्सनं ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पैसे घेऊन ट्विट करत असल्याचं म्हणणाऱ्यांना दोघींनीही सुनावलं आहे. वाचा सविस्तर

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT