National Education Day 2022
National Education Day 2022 esakal
देश

National Education Day 2022 : का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिवस ; काय आहे शिक्षक आणि शिक्षण दिनातील फरक

सकाळ डिजिटल टीम

Maulana Abul Kalam Azad Birth Anniversary : भारतात दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) म्हणून साजरा केला जातो. देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांचा ११ नोव्हेंबर हा जयंती दिन आहे. आझाद हे स्वातंत्र्यसैनिक आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री (1947 ते 1958) होते. आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले होते.

मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला होता. त्यांचे वडील मोहम्मद खैरुद्दीन हे एक मुस्लिम विद्वान होते. मौलाना आझाद यांचे पूर्ण नाव - मौलाना सैयद अबुल कलाम गुलाम मुहियुद्दीन अहमद बिन खैरुद्दीन अल-हुसैन असे होते. आझाद केवळ 11 वर्षांचे असताना त्याच्या आईचे निधन झाले.

वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा जुलैखा बेगम यांच्याशी विवाह झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण इस्लामिक पद्धतीने झाले. इस्लामी शिक्षणाव्यतिरिक्त त्यांनी इतर गुरूंकडून विज्ञान, इतिहास आणि गणिताचेही शिक्षण घेतले. अबुल आझाद यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी उर्दू, पर्शियन, हिंदी, अरबी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व मिळवले.

तरुणांनीही देशाच्या स्वातत्र्य संग्रामात भाग घ्यावा असे त्यांना वाटत होते. त्यामूळेच आझाद यांनी 1912 मध्ये सप्तकी पत्रिका आणि अल-हिलाल या उर्दू भाषेतील पत्रिका काढण्यास सुरूवात केली. स्वातंत्र्यसंग्राम आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 1992 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आझाद समर्पित स्व-अभ्यासाद्वारे इंग्रजी शिकले आणि बरेच पाश्चात्य तत्त्वज्ञान वाचले. त्यांना पारंपारिक मुस्लिम शिक्षण आवडत नव्हते आणि ते आधुनिक शिक्षणतज्ञ सर सय्यद अहमद खान यांच्या विचारांशी सहमत होते.

आझाद हे एक उत्तम वक्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण आणि तांत्रिक शिक्षणाबरोबरच वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत सर्व मुलांसाठी मोफत सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण सुरू केले. त्यांनी महिलांच्या शिक्षणावर भर दिला.

समाजाच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येपर्यंत म्हणजेच महिलांपर्यंत पोहोचल्याशिवाय राष्ट्रीय शिक्षणाचा कोणताही कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. असेही त्यांचे विचार होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते २ फेब्रुवारी १९५८ पर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून काम केले. २००८ मध्ये, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांचा वाढदिवस शिक्षण दिन म्हणून ओळखला जातो. तेव्हापासून दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.

आझाद यांनी संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी, साहित्य अकादमी या संस्थांची स्थापना केली. इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्ससह आजच्या बहुतांश प्रमुख सांस्कृतिक आणि साहित्यिक अकादमींची स्थापना. त्यांच्या कार्यकाळात झाली आहे. आयआयटी, आयआयएसटी देशात सुरू करण्यात आझाद यांचे भरीव योगदान होते.

शिक्षक दिन आणि शिक्षण दिन फरक

दरवर्षी ५ सप्टेंबरला भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो. डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. या दिवशी देशभर राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. तर, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री असलेल्या अबुल आझाद यांचा जन्मदिन हा शिक्षण दिन म्हणून साजरा करतात. अबुल आझाद एक स्वातंत्र्यसैनिकही होते. स्वातंत्र लढ्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT