a girl cut her tongue and offered it to goddess) sakal
देश

अंधश्रद्धेच्या आहारी जात तरुणीने कापली स्वतःची जीभ

युवतीने अंधश्रद्धेला आहारी जात स्वत:ची जीभ कापून मूर्तीला अर्पण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

सकाळ डिजिटल टीम

मध्यप्रदेशातील सिधी या जिल्ह्यात एक युवतीने अंधश्रद्धेच्या आहारी जात असे काही केले जे एकूण तुम्हाला धक्का बसेल. युवतीने अंधश्रद्धेला आहारी जात स्वत:ची जीभ कापून मूर्तीला अर्पण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. (shocking incident took place 21 year old girl cut her tongue and offered it to goddess)

ही मुलगी रोज देवीच्या मंदिरात यायची. ती नेहमीप्रमाणे मंदिरात गेल्यानंतर प्रार्थना करताना तीने स्वत:ची जीभ कापली आणि खिडकीच्या बाहेरून देवीच्या चरणी अर्पण केली.सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

युवतीने जीभ कापल्यानंतर हे प्रकरण थेट तेथील प्रशासनाकडे गेलं. त्यांनी लगेच पावलं उचलत उपचारासाठी मुलीला तात्काळ हलवलं. सध्या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सिधी जिल्ह्यातील बारागाव गावात घडली.

ही तरुणी दररोज देवीच्या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी येत असल्याचे सांगितले जात आहे. तीची देवीवर खुप श्रद्धा असल्याचे गावकरी सांगतात.यातूनच तीने अंद्धश्रद्धेच्या आहारी जाऊन हे कृत्य केल्याचं शक्यता वर्तवली जातेय.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार,गावात राहणारे युवतीचे वडील हे गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिराशेजारी असलेल्या देवीच्या मंदिरात आले होते. तीने आईसोबत येथे पूजा केली. इतक्यात तीने जीभ कापली आणि खिडकीच्या बाहेरून देवीच्या पायावर फेकली.विशेष म्हणजे तिच्या आईलाही याचे आश्चर्य वाटले.

या युवतीचं वय फक्त 21 वर्षीय आहे. मुलीने असे का केले, यासंदर्भात पोलिस तपास करत आहे.सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत अंधश्रद्धेविरोधात रोष व्यक्त करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT