Solar Eclipse 2022 सकाळ डिजिटल टीम
देश

Solar Eclipse 2022: यावर्षीचं पहिलं सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात; केव्हा आणि कुठे दिसणार?

भारतीयांना या सूर्यग्रहणाचे साक्षीदार होता येणार का? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

यावर्षीच्या 2022 वर्षामधील पहिलं सूर्यग्रहण 30 एप्रिलला होणार आहे. जगात अमेरिकेचा काही भाग, पॅसिफिक ओशन, अटलांटिक आणि अंटार्टिकच्या काही भागात हे सूर्यग्रहण दिसणार आहे. खरं तर भारतीयांना या सूर्यग्रहणाचे साक्षीदार होता येणार नाही. (The first solar eclipse of the year 2022 is all set to take place on April 30.)

सूर्यग्रहण ही सामान्य खगोलीय घटना आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीला सूर्यग्रहण (Solar Eclipse) म्हणतात.

भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण 30 एप्रिल दिवशी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी सुरू होणार असून 4 वाजून 7 मिनिटांनी संपणार. सूर्यग्रहण दरम्यान हिंदू धर्म काही नियम पाळतात मात्र भारतामधून हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे ग्रहणाचे वेध, सुतककाळ पाळण्याचे बंधन भारतात नसणार.

जरी ग्रहण भारतात दिसणार नसलं तरीही लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे ऑनलाईन खगोलप्रेमीं याला पाहू शकणार. यंदाच्या एकूण 4 ग्रहणं येणार. त्यामध्ये 2 चंद्रग्रहणं आणि 2 सूर्यग्रहणं असणार त्यातील 30 एप्रिलचं सूर्यग्रहण भारतामधून दिसणार नसलं तरीही 16 मे दिवशी येणारे चंद्र ग्रहण भारतीयांना पाहता येणार आहे.

सूर्यग्रहण दरम्यान भारतात नियम पाळले जातात. अनेक ज्योतिषांच्या मते, जिथे ग्रहण दिसते, तिथल्या लोकांवर त्याचा परिणाम होतो. धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहण शुभ मानले जात नाही. यावेळी मांगलिक कामे करण्यास मनाई आहे. खाण्यापिण्यास, अंघोळ करण्यास मनाई असते. मंदिराचे दरवाजेही बंद ठेवले जातात. ग्रहणानंतर घर स्वच्छ केले जाते.

ग्रहण कधीही थेट डोळ्यांनी बघू नये. त्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं, ग्लासवेअर, टेलिस्कोप, बॉक्स प्रोजेक्टर वापरण्याचे आवाहन केलं जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

Karnataka Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 1.50 टक्क्यांची वाढ; 'या' तारखेपासून लागू होणार नवे वेतन

Latest Marathi News Live Update : नीट प्रकरणातील संशयित शुभम खैरनारची सीबीआयकडून चौकशी सुरू, दिल्लीला नेण्याची शक्यता

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SCROLL FOR NEXT