study news
study news esakal
एज्युकेशन जॉब्स

Viral : अभ्यास करतांना लहान मुलाने आपल्या वडिलांना सांगितली अशी गोष्ट

सकाळ वृत्तसेवा

इंस्टाग्राम वर काहीही व्हायरल व्हायला वेळ लागत नाही पण य वेळेस जे व्हायरल आहे त्यांनी तुम्ही नक्कीच हादराल. या व्हिडिओ मध्ये एक मुलगा अभ्यास करतो आहे आणि त्याचे बाबा त्याच्या जवळ बसले आहेत तो अभ्यास करता करता अचानक अस काहीतरी म्हणून गेलो.

नुकताच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक लहान मूल आपल्या वडिलांशी बोलताना दिसतो आहे. व्हिडीओतील मुलाचा निरागसपणा पाहून तुमचेही ह्रदय हादरून जाईल.

सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडिओ तुम्हाला हसवतात, तर काही व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करतात. त्याच वेळी, काही व्हिडिओ आहेत जे लोकांच्या हृदयाला स्पर्श करतात.

नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणेल. हा व्हिडिओ एका लहान मुलाचा आहे, जो सोशल मीडियावर आपल्या क्यूट स्टाइल आणि मजेदार गोष्टींनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडिओमध्ये एक लहान मूल अभ्यास करता करता आपल्या वडिलांना आपण आता मोठे झाले आहोत या आविर्भावात त्याची लहान पणाची गंमत सांगतो आहे, ज्यामध्ये मुलाचा निरागसपणा पाहून तुम्हालाही खूप समाधान वाटेल.

व्हिडिओमध्ये या मुलाने आपल्या हातात पेन्सिल धरली आहे आणि समोर एक वही देखील आहे. व्हिडिओमध्ये मुलगा त्याच्या वडिलांना म्हणतो, 'बाबा, मी लहान होतो ना तेव्हा मी ट्यूशनमध्ये ऋषीचा जो ऋ आहे ना तो लिहुच शकत नव्हतो पण आता मी मोठा झालो आहे तर मला आता तो काढता येतो.

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मी आता मोठा झालो आहे.

आतापर्यंत ही पोस्ट 10 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. हा व्हिडिओ 531k लोकांनी लाइक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या फनी रिअॅक्शन्स देता आहेत.

एका यूजरने कमेंट केली आहे की, 'आता तू खूप मोठा झाला आहेस.' आणखी एका इंस्टाग्राम यूजरने कमेंट केली आहे की, 'क्यूट बेबी, माझ्या भाच्यासारखा.' तिसर्‍या युजरने कमेंट केली की, 'किती गोंडस मुलगा.' बर्‍याच लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया हार्टच्या किंवा हसणार्‍या इमोजिंनी दाखवल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT