esakal

ग्लोबल

Kim Jong Un Successor : उत्तर कोरियाचे हुकूमशहा 'किम जोंग उन' यांचा उत्तराधिकारी ठरला?

North Korea Succession: दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस (एनआयएस) ने संसद सदस्यांना दिली माहिती; जाणून घ्या काय म्हटले आहे?

Mayur Ratnaparkhe

Kim Jong Un Reportedly Names Kim Ju Ae as Successor: आपल्या बेधडक निर्णयामुळे आणि मूडी स्वभावामुळे जगात कायमच चर्चेत असणारे, उत्तर कोरियाचे प्रमुख नेते अन् हुकूमशहा किम जोंग उन यांनी त्यांची मुलगी किम जू ए हिला आपली उत्तराधिकारी म्हणून निवडले असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था, नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस (एनआयएस) ने आज संसद सदस्यांसोबत बंद दाराआड झालेल्या ब्रीफिंग दरम्यान ही माहिती जाहीर केली.

खरंतर किम जू ए हिच्याबद्दल सार्वजनिकरित्या फारच कमी माहिती उपलब्ध आहे. ती साधारणपणे अवघी १३ वर्षांची असल्याचे मानले जाते आणि तिचा जन्म २०१३ मध्ये झाला होता. ती पहिल्यांदा नोव्हेंबर २०२२ मध्ये एका लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान दिसली. तेव्हापासून, ती तिच्या वडिलांसोबत शस्त्रास्त्र चाचण्या, लष्करी परेड,  फॅक्टरी ओपनिंग आणि कोरियन पीपल्स आर्मीचा स्थापना दिवस अशा अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये दिसलेली आहे. 

मात्र एनआयएसने सांगितले आहे की, किम जू ए आता "उत्तराधिकारी नियुक्तीच्या टप्प्यावर" पोहोचली आहे. यापूर्वी, एनआयएसने ती उत्तराधिकारी प्रशिक्षणाच्या टप्प्यात असल्याचे म्हटले होते, परंतु आता तिच्याबाबतचे मूल्यांकन बदलले आहे. याचा अर्थ उत्तर कोरियातील किम कुटुंबाच्या चौथ्या पिढीकडे सत्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जानेवारी २०२६ मध्ये, तिने कुमसुसन पॅलेसला भेट दिली, जी उत्तराधिकाराचे एक महत्त्वाचे चिन्ह मानली जाते. सप्टेंबर २०२५ मध्ये, ती तिच्या वडिलांसोबत बीजिंगला गेली, जो तिचा पहिला परदेश दौरा होता. तिथे, तिने चिनी नेते शी जिनपिंग यांची भेट घेतली आणि उत्तर कोरियाच्या दूतावासातील कार्यक्रमांना हजेरी लावली होती.

एनआयएस आता किम जू ए तिच्या वडिलांसोबत येणाऱ्या वर्कर्स पार्टी काँग्रेसमध्ये दिसते की नाही आणि तिला तेथे कोणतेही अधिकृत पद मिळते का? यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर असे झाले तर उत्तराधिकाराबद्दलच्या चर्चांना अधिकच बळकटी मिळणार आहे.

कारण, एनआयएस म्हणते की या कार्यक्रमांमधून असे दिसून येते की, किम जू ए आता धोरणात्मक बाबींवर माहिती देत ​​आहेत आणि तिला पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पदावर असल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT