आरोग्य

Benefits of Cucumber : सकाळी उपाशी पोटी हे फळ खाल तर उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणारच नाही!

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवायचे असेल तर रोज काकडी खा

Pooja Karande-Kadam

Benefits of Cucumber : येणारा उन्हाळा अधिकच तापणार आहे. त्यामुळे लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी,असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी असे डॉक्टरही सुचित करत आहेत.

उन्हाचा सर्वात जास्त फटका आपल्या शरीराला बसतो. त्याचे कारण म्हणजे उन्हाचा पारा होय. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यापैकी प्रमुख समस्या म्हणजे शरीर डिहायड्रेड होणं होय.

शरीर हायड्रेड ठेवण्यासाठी अनेक पदार्थ, फळांचे ज्युस, सरबतांचे सेवन केले जाते. पण, सतत सरबत पिणं काहीवेळेला नकोसं होतं. त्यामुळेच अगदी कमी प्रमाणात जास्त फायदा देणारा एक पदार्थ आहे. त्याचे फायदे आपण जाणून घेऊयात.

आपल्या रोजच्या आहारात तुम्ही काकडीचे सेवन केले. तर तुम्हाला जास्त फायदा होतो. त्याच कारण असे की, काकडीमधून आपल्या शरीराला केवळ पाणीच मिळतं. त्यामुळे काकडीचे सेवन केले तर आपल्या सरीराची ९० टक्के पाण्याची गरज भागते. काकडीमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन डी यासारखी पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

काकडीतील पोषक घटक

आहार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडीमध्ये पाण्यासह फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि पोटॅशिअम सारखी पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असता.

याशिवाय काकडीमध्ये व्हिटॅमिन – बी, ए आणि ॲंटी-ऑक्सीडेंट्सही मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला अनेक लाभ मिळू शकतात. फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या समस्यांपासून ॲंटी-ऑक्सीडेंट्स शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.

काकडी कधी खावी

रोज सकाळी उठल्यावर एक किंवा दोन काकड्या स्लाईस करून खाऊ शकता. किंवा त्याचे सॅलेडही खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात.

पहिला फायदा म्हणजे,

शरीराला असलेल्या पाण्याची गरज ओळखून काकडी आपल्याला मदत करते. काकडीचे उपाशी पोटी सेवन केल्याने शरीर कोरडे पडत नाही. त्यामुळे तुम्हाला थकल्यासारखे वाटत नाही. शरीरात पाण्याची कमतरता भासल्याने चक्कर येते, काहीवेळा पोट गच्च होणं, साफ न होणं अशा समस्या उद्भवतात. पण काकडीचे सेवन करणे फायद्याचे ठरते. त्यामुळेच रोज सकाळी काकडीचे सेवन करा.

पित्ताचा त्रास कमी होतो

तुम्हाला रात्रीच्या खाण्याने पित्ताचा त्रास होत असेल. तर त्यावर काकडी गुणकारी ठरते. सकाळी उठल्यावर काकडी खाल्ल्याने तुमचा पित्ताचा त्रास कमी होतो. तसेच, दिवसभर उन्हामुळे शरीर बेजार होऊन जीव कासाविस होतो तेव्हा काकडी खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो.

उन्हाळ्यात शरीर थंड रहावे म्हणून काकडीचे सेवन करणे फायद्याचे ठरते. दिवसभरात दोन काकडी खाल्ल्याने शरीर नॉर्मल राहते. त्यामुळेच वाढत्या उन्हाळ्यात शरीर थंड ठेवायचे असेल तर रोज काकडी खा.

पोटाचे आजार

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून दिले जाते आणि यामध्ये असलेले सॉल्युबल फायबर्स पोट साफ करतात. यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो तसेच अन्नपचन व्हायला खूप मदत मिळते. 

यासोबतच यामध्ये इरेप्सिन नावाचे अ‍ॅन्झाइम असते जे पोटासाठी खूप चांगले असते. हे खाल्ल्यामुळे अल्सर, बद्धकोष्ठ, अपचन यासारखे पोटाशी संबंधित आजार होत नाहीत.

काकडी वजन कमी करते

अंदाजे एक कप (104 Gm) काकडीमध्ये फक्त 16 कॅलरीज असतात. तर एका अख्ख्या काकडीमध्ये 45 कॅलरीज असतात. म्हणजेच जरी तुम्ही काकडी जास्त प्रमाणात खाल्ली तरी यामुळे तुमचे वजन वाढणार नाही.

काकडीमध्ये असणारे हाय वॉटर कंटेट वजन कमी करायला मात करतात. 3,628 लोकांवर केल्या गेलेल्या 13 वेगवेगळ्या अभ्यासांच्या निष्कर्षातून असे स्पष्ट झाले आहे की भरपूर पाणी असलेल्या आणि कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे वजन कमी करायला मदत करतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT