Kesar Water To Control Cortisol Levels And Lose Belly Fat: आजकाल धावपळीच्या जीवनात अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट करतात, जिम जॉईन करतात. पण काही वेळा सगळे प्रयत्न करूनही पोटाची चरबी कमी होत नाही. यामागे मुख्य कारण म्हणजे वाढलेली कॉर्टिसॉल पातळी.
कॉर्टिसॉल हा एक तणाव हार्मोन आहे, जो शरीरात तणाव आणि चिंता वाढल्याने जास्त प्रमाणात उत्सर्जित होतो. यामुळे कितीही शारीरिक हालचाली केल्या किंवा डाएट फॉलो केले तरी देखील पोटाभोवतीची चरबी कमी होत नाही. मात्र, यावर नैसर्गिक उपाय म्हणून केशर प्रभावी ठरू शकते.
तज्ज्ञांच्या अनुसार पोटाभोवतीची चरबी हार्मोनल असू शकते, जी कॉर्टिसॉलच्या वाढीमुळे होऊ शकते. साधारणतः २० ते ४५ वयोगटातील लोकांना ही समस्या जास्त उद्भवू शकते. परंतु यावर उपाय म्हणून दररोज केशर पाणी प्यावे, असे तज्ज्ञ सांगतात. यामुळे कॉर्टिसॉल हार्मोनमुळे जॅम झालेली पोटाभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होईल.
तुम्हाला जर पोटाभोवतीची चरबी कमी करायची असेल, तर तुम्ही केशर पाणी पिऊ शकता. हे पाणी रात्री तयार करून सकाळी पिणे जास्त गुणकारी ठरते.
शुद्ध केशराच्या ४ काड्या घ्या. त्या रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. आणि सकाळी उठल्यावर हे पाणी प्या.
ताण कमी करते
केशरमध्ये क्रोसिन आणि सफ्रानल हे जैवसक्रिय घटक असतात, जे मूड सुधारण्यात मदत करतात आणि तणावाचे प्रमाण कमी करतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या मन शांत राहते.
सेरोटोनिन पातळी वाढवते
केशर नैसर्गिक अँटिडिप्रेसेन्टप्रमाणे कार्य करते. यामुळे सेरोटोनिन म्हणजेच 'हॅपी हार्मोन' ची पातळी वाढते आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते.
सुखकर झोप मिळते
केशर नर्व्हस सिस्टिमला शांत करून गाढ आणि आरामदायी झोप लागण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर व मन दोन्ही ताजेतवाने राहते.
कॉर्टिसॉल नियंत्रण
केशर शरीरातील हार्मोन्सचा समतोल राखून वाढलेल्या कॉर्टिसॉल पातळीवर नियंत्रण ठेवते, ज्यामुळे दीर्घकालीन तणाव आणि त्यासंबंधित आरोग्य समस्यांपासून होतो.
त्वचेसाठी उपयुक्त
दररोज केशरचे पाणी पिणे चेहऱ्यासाठी एक उत्तम उपाय आहे. यामुळे चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या, ओपन पोर्स कमी होण्यास मदत होते. तसेच निस्तेज चेहरा चमकदार करण्यासाठी मदत होते.
ऍनिमिया टाळते
केशरात आयरन आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात, जे लाल रक्तपेशींची निर्मिती वाढवतात आणि शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित ठेवतात. यामुळे अशक्तपणा, थकवा आणि ऍनिमियाचा धोका कमी होतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.