World Ankylosing Spondylitis Day:
World Ankylosing Spondylitis Day: सकाळ
आरोग्य

भारतात दहा लाख लोकांना Ankylosing Spondylitis चा आजार

सकाळ डिजिटल टीम

अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस (एएस) हा सांध्यांना सूज आल्यामुळे जडणारा एक वातविकार आहे, जो प्रामुख्याने पाठीच्या मणक्यावर आणि सॅक्रॉइलिक जॉइंट्स म्हणजे आपला मणका जिथे पेल्व्हिसशी जोडला जातो त्या भागावर परिणाम करतो. यामुळे पाठीचा खालचा भाग, हिप आणि पेल्व्हिक भागात वेदना होतात.

भारतामध्ये सध्या सुमारे १०.६५ लाख लोकांना या आजाराचे निदान झाले आहे, व ग्लोबल डेटाच्या ताज्या अभ्यासानुसार हे प्रमाण २.९५ टक्‍के इतक्या वार्षिक वाढीच्या गतीने वाढेल असा अंदाज आहे. या आजाराविषयी असलेल्या अज्ञानामुळे ६९ टक्‍के रुग्णांच्या बाबतीत चुकीचे निदान केले जाते किंवा त्यांना आपल्या आजाराची माहितीच नसते. यातून हा आजार अधिक गंभीर स्वरूप धारण करतो.

डॉ. प्रवीण पाटील, र्हुमॅटोलॉजिस्ट, एमआरसीपी, एफआरसीपी, सीसीटी-हृमॅटोलॉजी, पुणे सांगतात, “हृमाटॉइड आर्थ्रराइटिससारख्या स्नायू व अस्थिंशी संबंधित आजाराच्या तुलनेत अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिसच्या निदानास विलंब होण्याचे प्रमाण अधिक आहे.

निदानाला विलंब झाल्याने हृमॅटोलॉजिस्टकडे जाऊन आजारावर उपचार सुरू करण्यासही उशीर होतो. म्हणूनच या प्रश्नी जागरुकता निर्माण करणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. निदानास उशीर झाल्यास अनेक प्रकारची लक्षणे दिसून येऊ लागतात आणि त्यामुळे अधिकच्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.”

या वर्षीच्या जागतिक अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस दिनी एएसविषयी काही महत्त्वाची तथ्ये जाणून घेऊ या म्हणजे हा आजार व त्यावरील उपचारपद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.

१. अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस हा एक इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज आल्याने होणारा आजार आहे.

एएस हा आजार सांध्यांची नैसर्गिकपणे झीज झाल्याने उद्भवत नाही तर शरीरामध्ये दुर्धर स्वरूपाची दाहकारक स्थिती निर्माण झाल्याने, अर्थात सूज आल्याने होतो. तसेच या आजारामध्ये होणा-या वेदना या तुम्ही आपल्या सांध्याची हालचाल थांबवली की अधिकच वाढतात आणि सुजेमुळे होणा-या या वेदना सकाळच्या वेळी अधिक तीव्रतेने जाणवतात. आपली रोगप्रतिकारशक्ती गफलतीने पाठीच्या मणक्यातील सांध्यांवर हल्ला करू लागल्याने हा आजार उद्भवतो.

२. कालपरत्वे मणक्याची हाडे एकमेकांना चिकटली जाऊ शकतात.

काही लोकांच्या बाबतीत एएसमुळे सांध्याच्या झालेल्या हानीमुळे सूज येणे, हाडांची झीज किंवा हाड वाढणे अशाप्रकारची लक्षणे दिसून येतात. मात्र इतरांच्या बाबतीत मणक्यांतील चकत्यांवर आणि पाठीच्या हाडांतील लिगामेन्ट्सवर कॅल्शियमचा थर साचतो व त्यामुळे मणके एकमेकांना चिकटतात. यातून ‘बांबूसारख्या मणक्या’ची स्थिती निर्माण होत जाते व रुग्णांना पाठीची हालचाल करणे अशक्य होऊन बसते. मात्र लवकर झालेले निदान आणि एएसवरील आक्रमक उपचारपद्धती यांच्या मदतीनेही प्रक्रिया रोखता किंवा मंदावता येते.

३. अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिसवरील उपचार:

आजार सुरू होतानाच लक्षणांचा काळजीपूर्वक पाठपुरावा करून आणि तज्ज्ञांचा, एखाद्या संधीवाततज्ज्ञाचा सल्ला घेतला तर आपण या स्थितीवर वेळेवर आणि अचूक उपचार मिळवू शकतो. संधीवाततज्ज्ञ रुग्णांना सर्वाधिक मानवतील असे उपचारांचे पर्याय सुचवू शकतात. या उपचारांमध्ये बायोलॉजिकल थेरपींसारखी औषधे आणि जीवनशैलीतील बदल यांत समतोल साधला जातो.

मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमधील कन्सल्टन्ट हृमॅटोलॉजिस्ट डॉ. समीर राज्याध्यक्ष म्हणाले, “बायोलॉजिक्स (अँटी-टीएनएफ व आयएल-१७ इन्हिबिटर्स)च्या आगमनाने एएसच्या व्यवस्थापनामध्ये मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. या अँटी-टीएनएफ औषधांद्वारे केल्या जाणा-या उपचारांना महिला रुग्ण कमी प्रतिसाद देत असल्याचे दिसून येते. शरीराची लवचिकता आणि हालचालींचा आयाम वाढविण्यासाठी, शरीराची ढब सुधारण्यासाठी आणि ताठरपणा व वेदना कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.“

४.एएस तरुणपणीच गाठू शकतो.

संधीवाताचा संबंध मध्यम वयाशी असतो असे आपल्याला वाटते, मात्र सूज आल्याने होणारा संधीवात पहिल्यांदा तरुण वयातही उद्भवताना दिसतो. Johns Hopkins Arthritis Center च्या मते तरुण वयात एएसचे दुखणे जडलेल्यांपैकी ८० टक्के रुग्णांना तिशी गाठण्याच्या आधीच आजाराची पहिली लक्षणे दिसू लागतात. जेमतेम ५ टक्के लोकांना पंचेचाळिशी किंवा त्याहूनही पुढे लक्षणे दिसतात. शरीराची चुकीची ढब, बैठी जीवनशैली आणि ताणतणाव यांच्यामुळे भारतातील तरुणांना या आजाराचा धोका अधिक आहे.

५. एएसचा स्त्री व पुरुषांवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो.

एएस असलेल्या पुरुष रुग्णांमध्ये पाठीचा मणका आणि पेल्व्हिस या दुखण्याच्या सर्रास आढळून येणा-या जागा आहेत. याच भागात आजार पहिल्यांदा दिसून येतो आणि तिथेच लक्षणे सर्वाधिक गंभीर असतात. याऊलट स्त्रियांच्या बाबतीत खांदे, पाय किंवा मानेच्या सांध्यांमध्ये वेदना जाणवतात. दाहकारक स्थितीचे रक्तातील निदर्शकही एएस असलेल्या स्त्री व पुरुषांमध्ये वेगवेगळे असते. एका अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार एएस असलेल्या पुरुषांच्या रक्तामध्ये दाहकारक स्थिती दर्शविणा-या घटकांची पातळी अधिक प्रमाणात वाढते. ही वाढ एएस असलेल्या स्त्रियांमध्ये तितक्या अधिक प्रमाणात दिसून येत नाही.

“एएस हा पुरुषांनाच होणारा आजार आहे असा समज पूर्वापार चालत आला होता, पण मोठ्या संख्येने महिला रुग्णही एएसचा त्रास अनुभवत असल्याचे दिसून येते. एएसचा त्रास सुरू होण्याचे वय पुरुष व स्त्रियांमध्ये सारखेच असते, मात्र स्त्रियांच्या बाबतीत अनेक कारणांमुळे (हा पुरुषांचा आजार असल्याचा समज) निदानास तुलनेने अधिक उशीर होतो व त्याचा अधिकचा भार पडतो. अनेक अभ्यासांतून असे सिद्ध झाले आहे की एंथेसायटिस, सोरायसिस आणि इन्फ्लेमेटरी बॉवेल डिजिज (आयबीडी) यांसारख्या सांध्याव्यतिरिक्तच्या जागांमध्येही हा विकार दिसून येण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते असेही अनेक अभ्यासांतून सिद्ध झाले आहे.” डॉ. राजाध्यक्ष पुढे म्हणाले.

६. एएससाठी जनुकेही कारणीभूत

विशेषत्वाने एचएलए-बी२७ हे जनुक एएस विकसित होण्याचा धोका वाढविणारे असल्याचे मानले जाते. मात्र एचएलए-बी२७ जीन चाचणी केल्याने निदानाची शक्यता फेटाळता येत नाही. एचएलए-बी२७ असलेल्या सुमारे २ टक्‍के लोकांना हा आजार होत असल्याचे स्पॉन्डिलायटिस असोसिएशन ऑफ अमेरिकाचे मत आहे तसेच एएस असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एचएलए-बी२७ जनुक असेलच असे नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT