World Radiography Day 2022 esakal
आरोग्य

World Radiography Day 2022 : कधी करावी लागते रेडीओग्राफी; काय आहेत फायदे

डीओग्राफी तंत्रज्ञान एक्स-रे पेक्षा अधिक मोठे काम करते

सकाळ डिजिटल टीम

Radiography Importans And Benefits : बहुतेक लोकांना असे काही आजार होतात ज्याची लक्षणे वरवर पाहता काहीच नसतात. पण, शरीरातील आतल्या भागात त्याच्या वेदना जाणवतात.

त्यामुळे डॉक्टर आपल्याला रेडीओग्राफी करायला सांगतात. त्याबद्दल फार माहिती नसल्याने आपण बोलताना डॉक्टरांनी एक्स-रे काढायला सांगिलता असेच म्हणतो. पण, खरंतरं रेडीओग्राफी तंत्रज्ञान एक्स-रे पेक्षा अधिक मोठे काम करते.

आज (8 नोव्हेंबर) जागतिक रेडिओग्राफी दिन आहे. दरवर्षी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. रेडिओग्राफी हे एक्स-रे तंत्रज्ञान असून त्याचा उपयोग शरीराच्या अंतर्गत अवयवांचे फोटो घेण्यासाठी केला जातो. या फोटोवरून रूग्णाला झालेला आजार शोधता येतो. त्यावर त्वरीत उपचार करता येतात.

रेडिओग्राफीचा थोडक्यात इतिहास

8 नोव्हेंबर 1895 रोजी एक्स-रे तंत्रज्ञानाचा शोध लागला. जर्मनीच्या वॉरबर्ग विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक विल्हेल्म कोनराड रोएंटजेन यांनी हा शोध लावला. हे तंत्रज्ञान विकसित झाल्यावर ते वापरणे खूप कठीण होते.

कालांतराने त्यात बरेच बदल झाले. आज रेडिओग्राफी तंत्र जवळजवळ सर्वत्र वापरले जाते. जेणेकरून शरीरात झालेला आजार समजून त्यावर योग्यते उपचार केले जातील. जागतिक रेडिओग्राफी दिन 2012 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

रेडीओग्राफी हे तंत्रज्ञान कसे काम करते आणि त्याचे आपल्याला फायदे काय आहेत याबद्दल जाणून घेऊयात. रेडिओग्राफी डॉक्टरांना रूग्णाच्या शरीरातील आजाराचे बारकावे समजण्यात मदत करते.

यासह, शरीराच्या अंतर्गत भागांच्या उच्च रिझोल्यूशन प्रतिमा घेतल्या जातात, ज्यामुळे रुग्णाचा स्पष्ट अहवाल मिळण्यास मदत होते. रेडियोग्राफीमुळे रोगांचे मूळ शोधण्यात मदत होते. आपल्या सर्वांना माहित आहे की रोगाचे योग्य निदान झाल्याशिवाय त्यावर उपचार शक्य नाही.

दातांची तपासणी आणि दातांसंबंधीचे आजार शोधण्यासाठी रेडिओग्राफी एक्स-रे देखील केला जातो. शस्त्रक्रियेनंतर, ऑपरेशन यशस्वी झाले की नाही हे शोधण्यासाठी, रेडिओग्राफी एक्स-रे केली जाते.

सामान्यतः डॉक्टर हाडांचा एक्स-रे एखाद्या अपघातानंतर हाड मोडले असेत तर त्याची स्थिती शोधण्यासाठी करतात. शरीराच्या कोणत्याही भागातील हाडांचे फोटो मिळविण्यासाठी रेडीओग्राफीचा वापर केला जातो.

सध्या स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामूळे स्तनाचा कर्करोग आणि स्तनाशी संबंधित आजार शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरले आहे. मॅमोग्राफी एक्स-रेच्या मदतीने स्तनाची अंतर्गत छायाचित्रे घऊन रोगाचे निदान केले जाते.

रुग्णाला त्वरित आणि योग्य उपचार देण्यासाठी हे तंत्र मदत करते. यामुळे डॉक्टरांना रुग्णाच्या आजाराबद्दलचे लवकर निदान होते. त्यावर योग्य उपचार केले जातात. रेडिओग्राफी ही एक्स-रे प्रक्रियेचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये इतर एक्स-रे किरणांसारखेच काही गंभीर परिणाम होऊ शकतात.

रेडिओग्राफी किरणांमूळे कर्करोग आणि मोतीबिंदू होण्याच्या जोखिम असते. याची शक्यता कमी असली तरी काळजी घ्यावी लागते. गर्भवती महिलांची रेडिओग्राफीची किरणे गर्भासाठी धोकादायक समजली जातात. ज्यामूळे गर्भाच्या वाढीमध्ये किंवा विकासामध्ये व्यत्यय येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बॉस माझी लाडाची' फेम आयुष संजीवची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; सोबतीला आहे ही अभिनेत्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT